घरदेश-विदेशधक्कादायक! कामाचा मोबदला मागितला म्हणून जिवंत जाळलं अन् फ्रिजरमध्ये ठेवला मृतदेह

धक्कादायक! कामाचा मोबदला मागितला म्हणून जिवंत जाळलं अन् फ्रिजरमध्ये ठेवला मृतदेह

Subscribe

वयवर्ष २३ असणाऱ्या कमल किशोरचा मृतदेह दारूच्या अड्ड्यावर फ्रीजरमध्ये जळलेल्या अवस्थेत सापडला

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथल पोलीस स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. खैरथल येथील दारूच्या दुकानाला भीषण आग लागल्याने या घटनेमध्ये दुकानदार जिवंत जाळला गेला असल्याचे सांगितले जात आहे. या दारूच्या दुकानाला अज्ञात कारणांमुळे आग लागली.

या अपघातात सेल्समन कमल किशोर याचा जागीच मृत्यू झाला. मात्र ही आग लागली नसून कमल किशोरच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याची आल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान याआधी राजस्थानच्या करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला कंत्राटदारानं पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

वयवर्ष २३ असणाऱ्या कमल किशोरचा मृतदेह दारूच्या अड्ड्यावर फ्रीजरमध्ये जळलेल्या अवस्थेत सापडला. कमल किशोरच्या कुटुंबियांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी असलेल्या तरुणाची आई याच गावाची सरपंच असल्याचे सांगितले जात आहे. मृत कमल किशोरच्या भावानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावेळी किशोरच्या भावाने असे सांगितले की, भाऊ खेरथल क्षेत्रात असलेल्या समीप कुमपूर गावात सुभाष यादव यांच्या दारूच्या अड्ड्यावर काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता.

पगार मागण्यासाठी कमल सुभाष यादव यांच्याकडे गेला. तेव्हा सुभाष यादव त्याला घेऊन दारूच्या अड्ड्यावर देले आणि त्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळले, असा आरोप कमल किशोरच्या भावाने केला आहे. कुटुंबियांनी सांगितले की, कंटेनर खोलल्यानंतर डीप फ्रिजरमध्ये कमलचा मृतदेह आढळला. कमलच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याआधी जाळण्यात आले, त्यानंतर त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्याता आला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असताना सध्या राकेश यादव आणि सुभाष यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


VIDEO: रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू न शकल्याने कोरोनाबाधिताला भररात्री नेलं खांद्यावरून!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -