घरCORONA UPDATEअखेर कोरोना विषाणूवर पहिले औषध सापडले, निर्मितीसाठी अमेरिका देणार ३.२ अब्ज डॉलर

अखेर कोरोना विषाणूवर पहिले औषध सापडले, निर्मितीसाठी अमेरिका देणार ३.२ अब्ज डॉलर

Subscribe

कोरोना विषाणूवर प्रभावी औषध तयार करण्यासाठी जगभरात अनेक संशोधन सुरु आहे. यातच अमेरिकेने कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी पहिले प्रभावी औषध बनवण्याची योजना सुरु केली आहे. अमेरिकेच्या जो बायडेन सरकाराने या कोरोना अँटीव्हायरस औषध निर्मितीसाठी तब्बल ३.२ अब्ज डॉलर देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला जर या औषध निर्मिती प्रयोगात यश मिळाले तर कोरोना विषाणूविरोधात उपचार करण्यात मोठी मदत होणार आहे. सोबतच कोरोना विषाणूविरोधात हे पहिले प्रभावी औषध ठरणार आहे.

अमेरिकेचे कोरोना विषाणूविरोधातील पहिले प्रभावी औषध 

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचे सल्लागार आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी या औषध निर्मितीच्या योजनेसाठी अब्ज डॉलर देण्याची घोषणा केली आहे. या आर्थिक निधीतून विविध औषधांचे क्विनिकल ट्रायल वेगाने केले जाणार आहे. हे औषध कोरोना संक्रमित रुग्णास गंभीर लक्षणे जाणवण्यापूर्वीच विषाणूला निष्क्रिय करणार आहे. या  औषधाचे क्लिनिकल ट्रायल यशस्वीरित्या झाल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत जगात अमेरिकेचे कोरोना विषाणूविरोधातील पहिले प्रभावी औषध उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

बायडेन सरकार देणार ३.२ अब्ज डॉलर निधी

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी सांगितले की, आत्तापर्यंत ३.२ अब्ज डॉलर निधीमधील ५० कोटी डॉलर  औषधावरील संशोधन आणि निर्मिती करण्यासाठी तसेच १ अब्ज डॉलर प्री-क्विनिकल ट्रायल आणि क्विनिकल ट्रायलसाठी वापरण्यात येणार आहेत. तर आता ७० कोटी डॉलरचा वापर औषधाच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. तर १ अज्ब डॉलरचा वापर नव्या अँटीव्हायरस औषध डिस्कवरी सेंटरच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. सध्या जगभरात हेपिटाइटिस बी आणि एड्ससारख्या अनेक विषाणुंवर औषधांच्या माध्यमातून उपचार केले जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवरही आता प्रभावी औषध उपलब्ध होणार आहे.

जगभरात कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. अमेरिकेत कोरोनाबाधितांना सध्या रेमडेसिवीर हे एकमात्र औषध दिले जात आहे. हेच औषध वापरण्याची परवानही अमेरिकनं सरकारने दिली आहे. परंतु हे औषध रुग्णास इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णास दिले जाते. परंतु आता अमेरिकेत अँटी व्हायरस प्रोग्राम फॉर पॅनडेमिक्सच्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी औषध शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यावर फाउची यांनी सांगितले की, त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा लोकांना कोरोना विषाणुची लागण होईल आणि त्यावर ते मेडिकलमध्ये जाऊन तात्काळ औषध घेत उपचार करु शकतील. सध्या जगभरात कोरोनाविरोधात उपचार करण्यासाठी अनेक औषधांवर संशोधन सुरु आहे. यात फायझरच्या औषधाचाही समावेश आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गात इंधनदरवाढीविरोधात पुन्हा शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -