घरदेश-विदेश.... आणि अमित शाह जय शाहांवर ओरडले , व्हिडीओ व्हायरल

…. आणि अमित शाह जय शाहांवर ओरडले , व्हिडीओ व्हायरल

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा असाच एक व्हिडीओ काँग्रेसने ट्विट केला आहे. या व्हिडीओत अमित शाह कॅमेरा ऑन असतानाच जय शाह यांना ओरडल्याचे दिसतं आहे.

सध्या देशातील राजकारण चांगल तापलं असून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडी करण्याची,एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यासाठी दोन्ही पक्ष  सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा असाच एक व्हिडीओ काँग्रेसने ट्विट केला आहे. या व्हिडीओत अमित शाह कॅमेरा ऑन असतानाच जय शाह यांना ओरडल्याचे दिसतं आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या टि्वटरवर हा व्हिडीओ टि्वट करण्यात आला आहे. यात पूजा सुरू असताना जय शाह इकडे तिकडे बघत असल्याने अमित शाह त्यांना ओरडून इकडे लक्ष दे असे रागवून सांगताना दिसत आहे. ‘आमा ध्यान दे’ असे ते गुजरातीमध्ये जय शाह यांना जरा रागावून सांगताना दिसत आहे. याच मुदद्यावर काँग्रेसने जय शाह यांना कॅमेरा सुरू असल्याचे माहित नव्हते वाटत असा उपहासात्मक टोमणा मारला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -