घरमनोरंजनजान्हवी कपूर लागली बायोपिकच्या तयारीला

जान्हवी कपूर लागली बायोपिकच्या तयारीला

Subscribe

सध्या बायोपिकचा जमाना असून अनेक व्यक्तिंवर बायोपिक येत आहेत. आता हा नवा बायोपिक भारतीय हवाई दलातील पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहे.

धडक गर्ल जान्हवी कपूर सध्या काय करत आहे? असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला असेल तर धडक गर्ल सध्या एका सिनेमाच्या तयारीला लागली आहे. एका बायोपिकमध्ये ती प्रमुख भूमिका बजावत असून या सिनेमातील तिचा लूक नुकताच रिव्हिल झाला आहे. निळ्या डगला घातलेला जान्हवीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : रणवीरच्या गाण्यावर थिरकली दीपिका

कोणावर येतोय बायोपिक ?

सध्या बायोपिकचा जमाना असून अनेक व्यक्तिंवर बायोपिक येत आहेत. आता हा नवा बायोपिक भारतीय हवाई दलातील पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहे. एअर फोर्सचा हाच निळा डगला तिने परिधान केला आहे. तिचा या फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा सिनेमा असून २०१९ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या रोलची जोरदार तयारी सध्या जान्हवी करत आहे. हा रोल अधिक चांगला करण्यासाठी त्यांनी गुंजन यांची भेट घेतली आहे. तर काहीच दिवसांनी ती विमान उडवण्याचे प्रशिक्षणही घेणार आहे.

- Advertisement -

मातीतला खेळ मोठ्या पडद्यावर; ‘सुर सपाटा’ लवकरच

कोण आहे गुंजन सक्सेना ?

१९९९ साली कारगिल युद्धात गुंजन यांचे योगदान आहे. त्यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या साथीदारांचे प्राण वाचवले होते. गुंजन यांना त्यांच्या शौर्यासाठी सूर्यवीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या या कामगिरीला उजाळा देणारा हा सिनेमा असणार आहे.

janhvi_WITH_GUJAN
जान्हवी कपूर गुंजन सक्सेनासोबत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -