घरदेश-विदेश'आयर्नमॅन ट्रायथलॉन' चॅलेंज पूर्ण करणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला

‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ चॅलेंज पूर्ण करणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला

Subscribe

अंजू खोसला (५२) यांनी तब्बल १५ तास ५४ मिनिटे ५४ सेकंद सायकल चालवून रचला नवा विक्रम. ऑस्ट्रियायेथील कॅरिंथिया येथे झाली होती स्पर्धा.

पंन्नाशीच्या पुढचे वय रिटारमेंटचे असते असे बोलले जाते. या वयात शरीर थकून अवाक्या बाहेरचे काम करण्याची ताकद शरीरात नसते. म्हणून अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही सक्तीच्या रिटायरमेंटवर पाठवतात. याच वयात एका भारतीय महिलेनी एक नवा विक्रम रचला आहे. तब्बल १५ तास ५४ मिनिटे ५४ सायकल चालवणारी ही प्रथम वृद्ध भारतीय महिला ठरली आहे. अंजू खोसला (५२) असे या महिलेचे नाव आहे. ऑस्ट्रियायेथे होणाऱ्या ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ या फिटनेस स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ३.८६ किमी. अंतर पोहून, १८०. २५ किमी. अंतर सायकलने आणि ४२. २ किमी. अंतर धावून पूर्ण करायचे होते. ही स्पर्धा सुरु केल्यावर विश्रांती न घेता हे तीन्ही टप्पे पार करणे आवश्यक आहेत.

“माझ्या कुटुंबात फिटनेसवर अधिक भर दिला जातो. हा आमच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. मागील दहा वर्षांपासून या स्पर्धेसाठी तयारी केली. भारतात अनेक महिला खेळाला जास्त महत्व देत नाहीत. भारतींयामध्ये स्पर्धा पूर्ण करणारी मी पाचवी महिला ठरल्याची माहिती रेकॉर्डवरुन मला कळाले. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या वृद्ध भारतीय महिलांमध्ये माझा प्रथम क्रमांक लागला. मागील दहा वर्षांपासून मी सायकलींग करण्यास सुरुवात केली. या पूर्वीही ५०० किमी चे अंतर २४ तास न थांबता सायकलद्वारे पार केले आहे. निरनिराळ्या सायकल स्पर्धामध्येही मी भाग घेतला. २०० किमी, ३०० किमी आणि ४०० किमी अंतराटा टप्पा गाढला होता.” – अंजू खोसला, स्पर्धा जिंकणारी पहिली वृद्ध भारतीय महिला

- Advertisement -

ऑस्ट्रिया येथे होणाऱ्या या स्पर्धेत २ हजार ७६१ स्पर्धकांनी भाग घेतला असून २ हजार ३१५ स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. अंजू ने या स्पर्धेत ३८ वा क्रमांक पटकावला.

माझ्या यशाचे श्रेय पुणे स्थित कोच कौस्तुभ राडकर यांना देते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी ही स्पर्धा पूर्ण करु शकले असेही त्या म्हणाल्या. या पुढेही त्या अशाच प्रकारे विक्रम रचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -