घरदेश-विदेशPFI कडून यूपीमध्ये पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न? एटीएसकडून 70 सदस्यांना अटक

PFI कडून यूपीमध्ये पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न? एटीएसकडून 70 सदस्यांना अटक

Subscribe

नवी दिल्ली : दहशतवादविरोधी पथकाने (ATS) रविवारी (7 मे) यूपीमध्ये छापा टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) 70 सदस्यांना अटक केली आहे. या छाप्यात मिळालेल्या कागदपत्रानुसार पीएफआयकडून यूपीमध्ये वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.

पीएफआयवर बंदी घातल्यानंतरही एटीएस आणि एनआयएने अनेकवेळा सदस्यांना अटक करून संघटना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण या संघटनेला पैसे मिळत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. या पैशांतून पीएफआयचा यूपीमध्ये पुन्हा दंगल भडकवण्याचा कट रचत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादविरोधी पथकाला (ATS) दिली होती. त्यानुसार रविवारी दहशतवादविरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्थेलासोबत घेत यूपीतील २० जिल्ह्यांमध्ये छापा टाकला. या छाप्यात यूपीमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

26 एप्रिल रोजी एनआयएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या सदस्यांना पकडण्यासाठी यूपी आणि पंजाबसह चार राज्यांमध्ये छापे टाकले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील रामपूरच्या काशीपूर गावात पीएफआयच्या सक्रिय सदस्याच्या अटकेनंतर एनआयएला महत्त्वाचे कागदपत्र मिळाले होते. यानंतर एटीएसने अटक केलेल्या पीएफआय सदस्यांची चौकशी केली असता अजून 213 सदस्यांची नावे समोर आली. यानंतर एटीएसने रविवारी 20 जिल्ह्यांमध्ये छापे टाकून 70 जणांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये ५० हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या परवेझ अहमद आणि रईस अहमद यांनाही वाराणसीतून अटक करण्यात आली आहे.

वाराणसीमध्ये 23 सक्रिय सदस्य
यूपीमधून अटक करण्यात आलेल्या सदस्यांची चौकशी केली असता असे समोर आले की, वाराणसीमध्ये पीएफआय संघटनेचे 100 हून अधिक सदस्य आहेत, तर यातील 23 सक्रिय आहेत. पीएफआयवर बंदी घातल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून यूपीमध्ये ही संघटना सक्रिय आहे. हातरस घटनेच्या तपासानंतर पोलिसांना पीएफआयने दंगली भडकावल्याचे पुरावे मिळाले आहेत. ३ मार्च रोजी एसटीएफने केरळमधील रहिवासी असलेल्या पीएफआयचा सक्रिय सदस्य कमल केपी याला अटक केली. याशिवाय जफर हाशिमीसह त्याच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -