घरदेश-विदेशतामिळ प्रतिनिधींची दुसरी तुकडी ‘काशी तामिळ संगम’मध्ये सहभागी होणार

तामिळ प्रतिनिधींची दुसरी तुकडी ‘काशी तामिळ संगम’मध्ये सहभागी होणार

Subscribe

तामिळनाडूच्या विविध भागांतील विद्यार्थी, सांस्कृतिक कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, इतिहासकार इत्यादींचा समावेश असलेल्या तामिळ शिष्टमंडळाची दुसरी तुकडी, महिनाभर चालणाऱ्या ‘काशी तामिळ संगम’ मध्ये सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी पवित्र क्षेत्र काशी शहरात पोहोचली. वाराणसी कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. काशी येथील महोत्सवात सहभागी झाल्यानंतर ते प्रयागराज आणि अयोध्या येथे भेट देतील.

महिनाभर चालणाऱ्या ‘काशी तमिळ संगम’मध्ये सहभागी होण्यासाठी तमिळनाडूच्या विविध भागातील प्रतिनिधींचे विविध गट वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये काशी येथे पोहोचणार आहेत. वाराणसी बरोबरच ते प्रयागराज आणि अयोध्या येथे देखील भेट देतील.

- Advertisement -

दोन प्रदेशांच्या व्यक्तींमधील देवाण-घेवाण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश, ज्ञान आणि संस्कृतीच्या या दोन परंपरांना एकत्र आणून, या दोन भागांतल्या लोकांमध्ये सामायिक वारशाची जाणीव निर्माण करणे, आणि त्यांच्यातील संबंध दृढ करणे हा आहे. यामुळे तामीळनाडूच्या प्रतिनिधीमंडळाला प्राचीन काशी शहराचे ऐतिहासिक महत्व जाणून घेता येईल. महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान, तामिळनाडू मधील विविध सांस्कृतिक गट काशीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतील.

उल्लेखनीय आहे की ‘काशी तमिळ संगम’चे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. तामीळनाडूमधील प्रतिनिधी मंडळा व्यतिरिक्त, काशी येथील स्थानिक रहिवासी देखील मोठ्या संख्येने महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -