घरCORONA UPDATECoronaVirus : चीनमधील 'अँटी-व्हायरस' वाहने ही कंपन्यांची चालाखी?

CoronaVirus : चीनमधील ‘अँटी-व्हायरस’ वाहने ही कंपन्यांची चालाखी?

Subscribe

नवीन मॉडेल्सच्या केबिनमध्ये असा प्रोटेक्शन बसवायचा आहे की, तुम्हाला मास्क परिधान केल्यावर जसे वाटते तसेच समाधान मिळेल.

चीनमधील कार कंपन्या आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये निर्माण होणारी चिंता कमी करण्यासाठी अँटी-व्हायरस फिचर वाली गाडी तयार करत आहे. नवीन मॉडेल्सच्या केबिनमध्ये असा प्रोटेक्शन बसवायचा आहे की, तुम्हाला मास्क परिधान केल्यावर जसे वाटते त्याप्रमाणे समाधान मिळेल. देशातील काही मोठ्या कार कंपन्यांनी या फिचरची वाहने लॉन्च केली आहेत. कोरोना व्हायरसचे सावट संपूर्ण जगात पसरले असून काही देशांनी लॉकडाऊन लागू केला. यावर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांपासून चीनमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये तफावत आली आहे.

गिली अँटी- व्हायरस फिचर वाली कार लॉन्च करणारी पहिली कंपनी आहे. वायू प्रदूषणामुळे वाहन चालवणाऱ्या आरोग्याची चिंता वाटत आहे. कंपनीने वाहन बनवताना याच गोष्टीकडे लक्ष्य दिले आहे. कंपनीच्या हेल्दी कार प्रोजेक्टचा हेतू छोटे पार्टिकल्सला कारमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे आहे. याप्रकारे कार ड्रायवर आणि पेसेंजर यांना धोकादायक विषाणूपासून वाचविणे. गिली अँटी-मायक्रोबायल मेटेरियल्सला विकसित करत आहे. कारण कार कंट्रोल्स आणि डोर हँडल्सला बॅकटेरिया आणि व्हायरसपासून फ्री ठेवले जाईल.

- Advertisement -

गिलीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ग्राहक आपल्या वाहनांमध्ये खूप वेळ घालवत असतात. वाहन हे त्यांचे दुसरे घर असते. स्वास्थ्यवर्धक उत्पादने तयार करून आम्ही ग्राहकांच्या चांगल्या आरोग्याची डिमांड पूर्ण करू शकतो. ड्रायवर आणि पेसेंजर यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फिचर विकसित करणे हे कंपनीचे मुख्य लॉंग-टर्म डेव्हलपमेंट हेतू आहे. गिलीची नवी कार कॉन्टॅक्टलेन्स डिलिव्हरी साठी कंपनी ड्रोन चा वापर करत आहे, कारण ग्राहकांकडे चावी पोहोचविली जाते.

ब्रिटनच्या आयकॉनिक ब्रॅण्ड एमजीचे मालक एसएआईसीने एक अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा ऑप्शनल फिचर जोडले आहे. हा लॅम्प कारच्या एयर कंडिशनिंग सिस्टम पासून आलेली हवा स्टरलाईज करतो.

- Advertisement -

कोरोनाचा फायदा कंपन्या उठवित आहेत

चायना मार्केट रिसर्च ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर शाऊन रीन या गोष्टीवर सहमत नाही. कंपन्या कोविड-१९ च्या भयाचा फायदा उठवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त किंमतीत ग्राहकांना सेवा देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -