घरताज्या घडामोडीकामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या Antigen टेस्टला अखेर अमेरिकन CDC कडून मान्यता

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या Antigen टेस्टला अखेर अमेरिकन CDC कडून मान्यता

Subscribe

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना दुसरी, तिसरी लाट आली आहे. पण काही देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी नसलेल्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्याची मान्यता अखेर अमेरिकन सीडीसीकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्याचे नियोजन कसे करावे, तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित कसे ठेवावे, यासंदर्भात सीडीसीने सांगितले. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये प्रसार रोखण्यासाठी अँटीजेन टेस्ट हे एक प्रभावी साधन आहे. आरोग्य कर्मचारी नसलेल्या कामाच्या ठिकाणी एखादा कर्मचारी प्रवेश करण्यापूर्वी अँटीजेन टेस्टद्वारे बाधित आहे की नाही हे ओळखू शकतो. कारण अँटीजेन चाचणी करणे खूप सोपे आहे. तसेच त्याचा अहवाल त्वरित मिळतो आणि ती कमी खर्चात होते. त्यामुळे आता अमेरिकन सीडीसीनेकडून कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

- Advertisement -

अँटीजेन चाचण्या विशेषतः स्क्रीनिंगसाठी उपयुक्त आहेत. कारण त्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली की नाही हे ओळखू शकतात. व्यावसायिक पर्यटक आणि गर्दीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना कोरोना धोका आणि पसरवण्याचा धोका अधिक असतो. दरम्यान न्यूकेलिक अॅसिड एम्प्लिफिकेशन टेस्ट (NAATs) यासारख्या जलद पॉईंट ऑफ केअर स्क्रिनिंग उपलब्ध आहेत. यामध्ये अँटीजेन टेस्टबाबत माहिती कळते. CDC कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंगबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे…

कर्मचार्‍यांच्या टेस्टसाठी आरखडा आखणे

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून टेस्टिंग करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या चाचणीचा आराखडा आखताना मालकाने त्यासह अनेक घटकांचा विचार केला पाहिजे. कंपनीने कोरोना टेस्टिंगची उपलब्धता व्यवस्थित रित्या करावी. टेस्टिंग खर्च किती असावा याबाबत सांगितले की, अँटीजेन चाचण्याची किंमत सामान्यतः ५ किंवा ५० डॉलर असते. ज्या कर्मचाऱ्यांना अँटीजेन टेस्ट करणे आवश्यक आहे, कंपनीने त्यांना टेस्टसाठी पैसे देण्यास भाग पाडू नये. जर शक्य असेल तर पूर्णपणे लक्षणे नसलेल्या सर्वांचे लसीकरण करून त्यांना स्क्रीनिंग आणि चाचण्यातून मुक्त करावे. पण टेस्ट करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची परवानगी घेण अत्यंत महत्त्वाचे आहे. जर कर्मचाऱ्यांची परवानगी नसले, तर त्यांच्यासाठी योग्य ते इतर पर्याय पुरविण्याचा विचार केला पाहिजे. त्यांना टेलिवर्कद्वारे काम करायला देणे आणि त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे ठेवणे.

- Advertisement -

कशा कराव्यात अँटीजेन टेस्ट? 

कर्मचाऱ्यांना अँटीजेन टेस्ट करण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.

कामाच्या ठिकाणी किंवा क्लिनिकमध्ये थेट कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्याचा कार्यक्रम ठेवू शकता. याचे प्रमाणपत्र दिले जाईल याची कर्मचाऱ्यांची खात्री करून घ्यावी. तसेच दुसरा मार्ग म्हणजे मालकांनी टेस्ट किट उपलब्ध करून द्यावे किंवा कर्मचारी खरेदी करू शकतात आणि कोठेही त्याचा वापर करू शकतात. घरी, कारमध्ये, खासगी किंवा सोयीस्कर ठिकाणी तुम्ही चाचणी किटचा वापर करू शकता.

  • कर्मचारी चाचणी करण्यासाठी इच्छूक असेल जर तुम्ही टेस्ट किट स्क्रीनिंगसाठी कर्मचाऱ्यांना देऊ शकता.
  • एफडीए आणि ईयूएकडून प्राप्त झालेल्या टेस्टचा वापर करा.
  • चाचणी करण्याच्या कार्यक्रमात रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल अशी भीती न बाळगता कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक धोरण तयार करा.
  • टेस्ट निकालाची तारीख आणि वेळ, रेकॉर्ड करणार्‍या मोबाइल अ‍ॅप्सच्या वापरास प्रोत्साहित करावे.
  • योग्य स्वॅब स्थान निश्चित करण्यासाठी नेहमी टेस्ट किटच्या सूचनांचा संदर्भ घ्या.
  • ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना घरी किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवणे आवश्यक.

पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सूचना

पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांनी घरी राहा, ज्यांना संक्रमण झाले नाही अशा लोकांपासून दूर राहा. तसेच डॉक्टरांच्या संपर्कात रहा

कर्मचाऱ्यांना कोरोनापासून कसे सुरक्षित ठेवाल…

  • कर्मचाऱ्यांना लस घेण्यास प्रोत्साहित करणे. जेव्हा त्यांना लस उपलब्ध असेल तेव्हा त्यांना देण्यासाठी पाठिंबा देणे.
  • आजारी कर्मचाऱ्यांना घरीच राहण्यास सांगणे.
  • कोरोनाची लक्षणे दिसलेल्या कर्मचाऱ्यांची टेस्ट करणे.
  • तसेच कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची टेस्ट करणे.
  • कामाच्या ठिकाणी व्हेंटिलेशन सुधारण्यासाठी इमारत व्हेंटिलेशन व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे.
  • सोशल डिस्टन्सिंग कशी ठेवली जाईल याकडे अधिक लक्ष देणे.
  • कर्मचाऱ्यांची आणि ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवणे.
  • लोकांना कमीत कमी ६ फूट अंतरावर राहण्यास प्रोत्साहित करणे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी व्हिज्युअल मेसेजिंगचा वापर करावा.
  • ६० टक्के अल्कोहोल असलेले हँड वॉश किंवा हँड सॅनिटाझरचे वाटप करणे.
  • वारंवार स्पर्श करणारी जागेची सतत साफसफाई करणे.
  • नोकरीसाठी आवश्यक असलेले पीपीई कीट, मास्कचे वाटप करणे.
  • खाण्या-पिण्याचे ठिकाण वगळता इतर ठिकाणी मास्क वापर करणे अनिवार्य असणे.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -