घरताज्या घडामोडीJammu-Kashmir : काश्मीरच्या बर्फाच्छादित भागात बूस्टर डोस पुरवण्यासाठी लष्कराने केला ड्रोनचा वापर

Jammu-Kashmir : काश्मीरच्या बर्फाच्छादित भागात बूस्टर डोस पुरवण्यासाठी लष्कराने केला ड्रोनचा वापर

Subscribe

देशाच्या सीमेवर भारतीय जवान शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवून आहे. परंतु या व्यतिरिक्त कोरोना महामारिला हरवण्यासाठी कार्यरत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात, भारतीय लष्कर बर्फाळ भागात कोविड-१९ लसीचा बुस्टर डोस पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. ड्रोनद्वारे बूस्टर डोस निश्चित ठिकाणी पोहोचवले जात आहेत. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.

- Advertisement -

मिशन संजीवनीच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने दूरवर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना ड्रोनचा पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील शेतीला अत्याधुनिक बनवण्याच्या उद्देशाने शेतात कीटकनाशक फवारणीसाठी १०० शेतकरी ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आधुनिक शेतीच्या दिशेने नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील वर्षी १६ जानेवारी रोजी कोरोना महामारीविरूद्ध देशव्यापी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. यामध्ये पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले होते. तर मागील वर्षातील फेब्रुवारी महिन्यापासून भारतीय जवानांना लसीकरण करण्यात आले होते. यंदाच्या वर्षात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

- Advertisement -

कोरोना रुग्णांची स्थिती काय?

जम्मू-काश्मीरमध्ये काल(रविवार) कोविडशी संबंधीत एकही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाहीये. तसेच काल दिवसभरात १५१ इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जानेवारी महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सर्वात कमी रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोविडची तिसरी लाट २५ जानेवारी रोजी आल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. तर ६ हजार ५७० इतके नवे रूग्ण आढळून आले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून २०० पेक्षा कमी रूग्ण प्रदेशात आढळून येत आहेत.


हेही वाचा : Fodder Scam Case: चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर आज सुनावणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -