घरदेश-विदेशअनिल अंबानींच्या विरोधात अटक वॉरंट!

अनिल अंबानींच्या विरोधात अटक वॉरंट!

Subscribe

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात कोर्टाने अटक वाॉरंट जारी केले आहे. रिलायन्स विमा कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतरही मोबदला न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या विरोधात बिहारच्या सिव्हील कोर्टाने अटक वाॉरंट जारी केले आहे. रिलायन्स विमा कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोबदला न दिल्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट महाराष्ट्रच्या डीजीपींच्या माध्यमातून जारी करण्याचे आले आहे.

काय आहे प्रकरण?

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावचे रहिवासी सैनी साह यांचे ट्रक अपघातात निधन झाले. ही दुर्घटना १३ जुलै २०११ ला आसामच्या तिलौरी गावात घडली. सैनी साह यांनी त्यांच्या ट्रकचा विमा रिलायन्स कंपनीमध्ये काढला होता. १६ ऑगस्ट २०११ ला त्यांच्या आई कौशल्या देवी यांनी मधेपुरा कोर्टात विमा कंपनीवर मोबदल्यासाठी दावा दाखल केला होता. यावर कोर्टाने २८ फेब्रुवारी २०१७ ला विमा कंपनीने मोबदला आणि म्हणून १८ लाख ८३ हजार द्यायचे आदेश केले होते. त्याचबरोबर यावर नुकसान भरपाई म्हणून ९ टक्के व्याज विमा कंपनीने द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला होता.

- Advertisement -

कोर्टाच्या या आदेशानंतरही विमा कंपनीने त्याचे पालन न करता कौशल्या देवी यांना मोबदला दिला नाही. त्यानंतर त्यांनी सिव्हिल कोर्टात धाव घेतली. याविषयी कोर्टाने दोन वेळा रिलायन्स विमा कंपनीला नोटीस पाठवली. पण, तरीही कौशल्या देवी यांना मोबदला मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा कोर्टात धाव घेत रिलायन्स विमा कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेमध्ये अनिल अंबानी यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली होती. कोर्टाने कौशल्या देवींची विनंती मान्य करत अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हे वॉरंट महाराष्ट्र डिजीपीच्या माध्यमातून जारी करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -