घरदेश-विदेशमध्य प्रदेश निवडणूक २०१८: शिवराजसिंह चौहान या चुका नडल्या

मध्य प्रदेश निवडणूक २०१८: शिवराजसिंह चौहान या चुका नडल्या

Subscribe

मध्य प्रदेशमध्ये भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे. “माझ्या कार्यकाळात मी कुणाला दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो. भाजपच्या पराभवासाठी मी स्वतःला जबाबदार मानतो आणि आता मी मुक्त झालो आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली. मात्र गेल्या १३ वर्षांपासून मध्य प्रदेशात निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या शिवराज सिंह यांचा पराभव झाला कसा, याचा घेतलेला हा आढावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे दिर्घकाळ मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हा भाजपचा दुसरा प्रसिद्ध चेहरा. मागच्या तेरा वर्षांपासून ते मध्य प्रदेशचे नेतृत्व करत आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश हे तीसरे सर्वात मोठे राज्य आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी हे राज्य टिकवणे भाजपसाठी अंत्यत महत्त्वाचे होते. मात्र सध्या काँग्रेस मध्य प्रदेशवर पकड घेताना दिसत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या चुकांबद्दल…

- Advertisement -
Madhya Pradesh Elections 2018 : काँग्रेसकडे निर्णायक आघाडी 

शिवराज सिंह मुख्यमंत्री होण्याआधी विदिशा या मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडूण आले होते. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली. मात्र आपल्या १३ वर्षांच्या कार्यकाळात विकासासोबतच अनेक वादातही त्यांचे नाव जोडले गेलेले आहे. तसेच धक्कादायक वक्तव्ये करण्यातही शिवराजसिंह मागे नाहीत.

व्यापम घोटाळा – मध्य प्रदेशातील बकासूर

मध्य प्रदेशात सरकारमधील व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापम घोटाळा चांगलाच गाजला होता. या घोटाळ्यामुळे जवळपास ५० लोकांची जीवनयात्रा संपवण्यात आली आहे. २००४ ते २०१३ या काळात हजारो विद्यार्थी घोटाळे करून पास झाले. त्यातले बरेचसे मेडिकल परिक्षेला बसले होते. अनेक वाटांनी ते पास झाले. नंतर हा घोटाळा लपवण्यासाठी अनेकांची हत्या करण्यात आली.

- Advertisement -

निवडणूक प्रचारातील चूका

विधानसभा निवडणूकीदरम्यान भाजपने काँग्रेसच्या ज्यातिरादित्य सिंधीयावर टीकेची झोड उठवली. तर दुसऱ्या बाजुला सिंधिया सकारात्मक मुद्द्यावर चर्चा करत राहिले. तसेच सोशल इंडिनिअरींगवरही सिंधिया यांनी भर दिला.

पूरग्रस्तांची पाहणीवर टीका

मुख्यमंत्री असताना शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये पुर परिस्थितीची पाहणी करताना शिवराज सिंह यांना बॉडीगार्ड्सनी उचलून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

Shivraj singh chouhan flood trour
राज्यातील पूर परिस्थितीची पाहणी करताना शिवराज सिंह चौहान
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -