घरदेश-विदेशखलिस्तानी समर्थकाला महाराष्ट्र पोलिसांनी केले अटक

खलिस्तानी समर्थकाला महाराष्ट्र पोलिसांनी केले अटक

Subscribe

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक(एटीएस) ने ही कारवाई केली आहे. अटक आरोपी हा खलिस्तानी समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत खलिस्तानी समर्थकांना अटक केल्याची माहिती  उघडकीस आली आहे. देशांतर्गत तसेच पाकिस्तानसह दहशतवादी विचारसरणी असल्याच्या संक्षयावरून यांना अटक करण्यात आले आहे. हरपालसिंग प्रतापसिंग नगरा (४२) असे या आरोपीचे नाव आहे. याच्या जवळून एक देशी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस सापडले आहेत. हरपालसिंग हा मूळ पंजाब येथील रोपर जिल्ह्यातील रहिवाशी असून मागील काही काळापासून तो कर्नाटक येथील बेल्लारी येथे राहात होता. कर्नाटकहून पंजाबला ट्रक घेऊन जात असताना त्याला अटक करण्यात आली.

का केले अटक 

हरपालसिंग हा स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा समर्थक आहे. एटीएसने अटकेनंतर काही काळ ही माहिती गुप्त ठेवली होती. हरपालसिंगला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे करण्यात आले. हरपालला १७ डिसेंबरपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून हरपाल याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने टोळू बनवून देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करणार होता. हरपालसिंग याने सोशल मीडियाचाही वापर करुन तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न केला. या बरोबर तो पाकिस्तानाबरोबर काही दहशतवादी हालचालींमध्येही सामील होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -