घरदेश-विदेशऑस्ट्रेलियात नाइटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार; १ मृत्यू तर ३ जखमी

ऑस्ट्रेलियात नाइटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार; १ मृत्यू तर ३ जखमी

Subscribe

गेल्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये असाच अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होत ज्यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला होता.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एका नाइटक्सबमध्ये रविवारी अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा गोळीबार कोणी आणि का केला आहे याबाबत अद्याप कोणतिही माहिती समोर आलेली नाही.

पहाटेच्या दरम्यान घडली घटना

व्हिक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिटील चॅपेल स्ट्रीट आणि मालवर्न रोडजवळ असणाऱ्या नाइट क्लबमध्ये ही घटना घडली आहे. पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हा दहशतवादी हल्ला आहे का याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र पोलिसांचा तपास सुरु आहे. मेलबर्गमधील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षारक्षकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार नाइटक्लबच्या बाहेर करण्यात आला. नाइटक्लबच्या बाहेर त्यावेळी खूप जण उपस्थित होते. त्याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारमध्ये उपस्थित असलेल्या दोन आरोपींनी नाइटक्लबच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सुरक्षारक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सुरक्षारक्षकाच्या तोंडावर गोळी लागली होती. तर ती जण जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे कारण त्यांना गोळी खूप जवळून लागली.

पोलिसांकडून तपास सुरु

असे सांगितले जाते की, ऑस्ट्रेलिया जगातल्या त्या देशांमधील आहे जिथे गन कंट्रोलवर कठोर कायदे आहेत. १९९६ मध्ये तस्मानिया द्विपवर पोर्ट आर्थरमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात ३५ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर हा कायदा लागू करण्यात आला होता. गेल्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये असाच अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होत ज्यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -