घरदेश-विदेशअजहर, हाईज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित

अजहर, हाईज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित

Subscribe

बेकायदा कारवाई प्रतिबंध (यूएपीए) कायद्याअंतर्गत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर, लष्कर-ए-तोय्यबाचा प्रमुख हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना भारताने दहशतवादी घोषित केले आहे. याअगोदरही आंतरराष्ट्रीय पातळीवर मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात भारताला यश आले होते. त्यानंतर यूएपीए या नव्या कायद्याअंतर्गत भारताने मसूद अझहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना दहशतवादी घोषित केले आहे. या सर्वांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रिय गृहमंत्री पदाची सुत्रे हाती घेतले. गृहमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून अमित शहा दहशतवाद संपवण्यासाठी वेगवेगळे कायदे तयार करत आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला आहे. काश्मीरच्या खोर्‍यात लपलेल्या अतिरेक्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालण्याच्या बर्‍याच बातम्या समोर येत आहेत. काश्मीरचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचाही कायदा संमत करण्यात आला. त्याचबरोबर दहशतवादाला आळा घालण्यासाठी अमित शहा यांनी बेकायदा कारवाई प्रतिबंध (यूएपीए) कायदा राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात संमत केला. या कायद्याअंतर्गत दहशतवादी कारवाई करणार्‍या किंवा त्या कारवाईंना मदत करणार्‍यांना दहशतवादी ठरवण्याचा आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा कायदा संमत करण्यात आला. याच कायद्यान्वे आता मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद इब्राहीम आणि झकी-उर-रहमान अली यांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -