घरCORONA UPDATEहाताचं चुंबन घेऊन बरं करणाऱ्या बाबाचा कोरोनाने मृत्यू; २९ भक्त कोरोना पॉझिटिव्ह

हाताचं चुंबन घेऊन बरं करणाऱ्या बाबाचा कोरोनाने मृत्यू; २९ भक्त कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

राज्यातील सर्व बाबांना ताब्यात घेत त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे.

हाताचं चुंबन करुन बरं करणाऱ्या बाबाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम मध्ये ही घटना घडली आहे. शिवाय या बाबाच्या २९ भक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भक्तांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बाबाचा ४ जून रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रशासनाने बाबांच्या संपर्कांत आलेल्यांचा शोध घेत लोकांना क्वारंटाइन केलं आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता शहरात कोरोनाचा स्फोट झाला. या बाबाचा मृत्यू होण्यापूर्वी २९ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची बातमी आज तक या वृत्तसंस्थेने दिली आहे.


हेही वाचा – NEET आरक्षण प्रकरण: आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

रतलामच्या नायपुराचा हा बाबा जप आणि ताबीज देत असे. लोक मोठ्या संख्येने त्याच्या जवळ जात असत आणि तो कधीकधी लोकांच्या हाताचं चुंबन घ्यायचा. या बाबाच्या संपर्कात आलेले लोकांचा प्रशासन शोध घेत आहे. कोरोनाची लागण झालेले भक्त हे नायपुरा भागातील आहेत. नायपुरा शहराचं कोरोना हॉटस्पॉट बनलं आहे. शहरात एका बाबाने कोरोना पसरवल्यामुळे प्रशासनाने शहरातील अशा बाबांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. जवळपास २९ बाबा पकडले गेले आहेत आणि विविध क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवले आहेत. रतलामचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर ननावरे यांनी सांगितलं की, नायपुरा येथील एका बाबाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला. त्या बाबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -