घरदेश-विदेशबाबा रामदेव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार; नव्या वर्षात न्यायालयात राहणार हजर

बाबा रामदेव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार; नव्या वर्षात न्यायालयात राहणार हजर

Subscribe

हे प्रकरण घडले आहे बिहारमधील बेगसुराय भागात. येथील निंगा गावातील नागरिकाने बाबा रामदेव व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. पैसे भरूनही उपचार केले नसल्याचा आरोप त्यांनी तक्रराती केला आहे. बेगसुराय जिल्हा न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांच्यासमोर या तक्रार अर्जावर सुनावणी झाली.

बेगुसराय: योगगुरु बाबा रामदेव यांची योगासने शिकवण्याची पद्धती जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या पतंजली औषधांना मोठी मागणी आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारची दखल घेत न्यायालयाने त्यांना समन्सही बजावले आहे.

हे प्रकरण घडले आहे बिहारमधील बेगसुराय भागात. येथील निंगा गावातील नागरिकाने बाबा रामदेव व त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. पैसे भरूनही उपचार केले नसल्याचा आरोप त्यांनी तक्रराती केला आहे. बेगसुराय जिल्हा न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांच्यासमोर या तक्रार अर्जावर सुनावणी झाली. तक्ररारीची दखल घेत न्यायालयाने बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यानुसार १२ जानेवारी २०२३ रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. फौजदारी कलम ४२० व ४२७ अंतर्गत हे समन्स बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

महेंद्र शर्मा यांनी ही तक्रार केली आहे. १२ जून २०२२ रोजी बरौनी पोलीस ठाण्यात ही तक्रार नोदवण्यात आली.  पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड महर्षी काॅटेज योग ग्राम झुलामध्ये उपचारासाठी ९० हजार रुपये भरले होते. मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून हे पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर पतंजलीकडून उपचारासाठी तारीख देण्यात आली. त्या तारखेला पत्नी व मुलासोबत महेंद्र शर्मा हे पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना उपचारासाठी नकार देण्यात आला. तुमचे पैसे मिळाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

आपण पैसे भरल्याचे महेंद्र शर्मा यांनी सांगितले. तरीही त्यांना उपचार देण्यास नकार देण्यात आला. अखेर ते तेथून उपचार न घेताच परतले. त्यांनी याची पोलिसांत तक्रार केली. तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दिलेला जबाब व अन्य साक्षीदारांचे जबाब नोदवण्यात आले. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण हे न्यायालयात हजर राहून आपली बाजू माडतील.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -