घरCORONA UPDATECovid 19 - स्वॅब घेताना चिमुकल्याच्या नाकातून आलं रक्त, दोन दिवसांत बाळ...

Covid 19 – स्वॅब घेताना चिमुकल्याच्या नाकातून आलं रक्त, दोन दिवसांत बाळ दगावलं!

Subscribe

कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत ६१ हजारांहून जास्त लोकांचा जीव गेलेला असतानाच Swab Text घेणाऱ्या लॅब टेक्निशियनच्या हलगर्जीपणामुळे एका दोन दिवसांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार त्रिपुरामध्ये घडला असून या प्रकरणी चिमुकल्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राज्य सरकारच्या तपास समितीने देखील या प्रकरणावर आपला अहवाल तयार केला असून तो त्रिपुरा सरकारकडे सोपवण्यात आला असून आता पोलीस यासंदर्भात काय कारवाई करतात, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे त्रिपुरामध्ये आपल्या चिमुकल्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी माता कचरत असल्याचं दिसून आलं आहे.

नेमकं झालं काय?

हा सगळा प्रकार खरंतर घडला ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात. १० ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या गोविंद वल्लभपंत रुग्णालयात या चिमुकल्याच्या आईने बाळाला जन्म दिला. पण आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे बाळाची देखील कोरोना चाचणी (Corona Test) करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. मात्र, बाळाचा स्वॅब घेताना त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्या वेळी डॉक्टरांना विचारणा केली असता ते फारसं गंभीर नसून ठीक होईल, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मात्र, त्यात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर १२ ऑगस्ट रोजी त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

- Advertisement -

तक्रार इतक्या उशिरा का?

पण हे सगळं होऊनही त्याच्या आईला तक्रार दाखल करण्यासाठी २० दिवस गेले. आई कोरोना पॉझिटिव्ह (Covid 19) असल्यामुळे तिचेही रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत तिला रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. अखेर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नुकतंच बाळाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून भादंविच्या कलम १५७ अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने देखील तीन सदस्यांच्या एका तपास समितीकडे या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली होती. या समितीने देखील आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून त्रिपुरा गृहमंत्रालय त्याचा आढावा घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -