घरदेश-विदेशBank Holiday: सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, वाच सविस्तर

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, वाच सविस्तर

Subscribe

कामाचा योग्य आराखडा आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

बँकेशी संबधित(bank holiday) तुमचं काही काम असेल तर वेळीच पूर्ण करा. कारण या महिन्यात तब्बल 12 दिवस बँक हॉलिडे असणार आहे. यामुळे बँकेशी निगडीत कामाचे योग्य नियोजन आखूनच बँकेमध्ये जा.  या महिन्यात बँकेला कधी सुट्टी असणार आहे हे माहिती नसल्याच खातेधारकांना विणाकारण बँकेमध्ये फेरा होऊ शकतो. बँक हॉलिडे हे प्रत्येक राज्यात वेगवेळ्या दिवशी असतात. ज्या राज्यात सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी बँकेचे व्यवहार संपूर्णपणे बंद राहतील यामुळे कामाचा योग्य आराखडा आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.(Banks to be Shut for 12 Days in September)

सप्टेंबरमध्ये बँकाना किती दिवस सुट्ट्या आहेत

सप्टेंबर महिन्यात बँक एकूण 12 दिवस बंद राहणार आहे. वेगवेळ्या राज्यात सुट्ट्यांचे दिवस त्यांच्या सणानुसार वेगवेगळे असू शकतात. दर रविवारी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक नियमीत बंद असते.

- Advertisement -

 

सप्टेबंर महिन्यात या तारखेला बँकेला सुट्ट्या आहेत. (Bank Holiday in September 2021)

  • 5 सप्टेंबर – रविवार
  • 8 सप्टेंबवर – श्रीमंत शंकरदेव तिथी,गुवाहटी
  • 9 सप्टेंबर – तीज/हतालिका, गंगटोक
  • 10 सप्टेंबर – गशेश चतुर्थी, अहमदाबाद,बेलापूरस,भूवनेश्वर,चैनई,हैद्राबाद,मुंबई,नागपूर, पणजी
  • 11 सप्टेंबर – दुसरा शनिवार/ गणेश चतुर्थी दुसरा दिवस, महाराष्ट्र
  • 12 सप्टेंबर – रविवार
  • 17 सप्टेंबर – कर्म पूजा, रांची
  • 19 सप्टेंबर – रविवार
  • 20 सप्टेंबर – इंद्रजत्रा, गंगटोक
  • 21 सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस, कोची तिरूअनंतपूरम
  • 25 सप्टेंबर – चौथा शनिवार
  • 26 सप्टेंबर – रविवार

हे हि वाचा – RBI कडे सुट्ट्या पैशांचा ढीग! नाणे घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँक देणार तीन पट अधिक इन्सेन्टिव्ह

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -