घरदेश-विदेशRBI कडे सुट्ट्या पैशांचा ढीग! नाणे घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँक देणार तीन पट...

RBI कडे सुट्ट्या पैशांचा ढीग! नाणे घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँक देणार तीन पट अधिक इन्सेन्टिव्ह

Subscribe

पूर्वीच्या काळात १,२ आणि ५ रुपयांच्या नाण्यांना खूप मागणी होती, मात्र कालांतराने याच सुट्ट्या पैशांची मागणी कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे नाण्यांची मागणी इतकी कमी झाली आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) नाण्यांचा ढीग पडला आहे. या कारणानेच आता मध्यवर्ती बँकेने या नाण्यांवर तीन पट इन्सेन्टिव्ह वाढवले ​​आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, क्लीन नोट धोरणाअंतर्गत केंद्रीय बँकेकडून बँकांना नाणी पुरवली जात आहेत.

असे सांगितले जात आहे की, आरबीआय बँकांना आत्तापर्यंत प्रति बॅग २५ रुपयांचे इन्सेन्टिव्ह देत असे, म्हणजेच नाण्यांची पिशवी घेतल्यावर इन्सेन्टिव्ह म्हणून २५ रुपये स्वतंत्रपणे बँकेला दिले जात होते. मात्र आता ते वाढवून ६५ रुपये करण्यात आले आहे. सामान्य लोकांना नाणी देण्यासाठी आरबीआयने बँकांसाठी इन्सेन्टिव्ह रक्कम २५ रुपये प्रति बॅग वरून ६५ रुपये प्रति बॅग केली आहे. दरम्यान क्लिन नोट धोरणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा उद्देश असा आहे की, सर्व बँक शाखा लोकांना नोटांची देवाणघेवाण आणि नाणी उपलब्ध करण्याबाबत लोकांना अधिक चांगली सेवा पुरवू शकतील.

- Advertisement -

ग्रामीण आणि छोट्या शहरांमध्ये नाण्यांच्या वितरणासाठी बँकांना प्रति बॅग १० रुपये अतिरिक्त इन्सेन्टिव्ह दिले जाणार आहे, असे आरबीआयने अधिसूचनेत म्हटले आहे. तर केंद्रीय बँकेने असे सांगितले, १ सप्टेंबर २०२१ पासून, चलन चेस्टपासून निव्वळ पैसे काढण्याच्या आधारावर नाण्यांच्या वितरणासाठी २५ रुपयांऐवजी ६५ रुपये प्रति बॅग इन्सेन्टिव्ह दिले जाणार आहे. आरबीआयच्या परिपत्रकात असे म्हटले की, मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या नाणे आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, बँकांना अशा ग्राहकांना पूर्णपणे व्यावसायिक व्यवहार करण्यासाठी नाणी पुरवण्याचा सल्ला दिला जातो. बँका त्यांच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार शाखांना भेट देण्याऐवजी ग्राहकांना त्यांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी सेवा (डोअर स्टेप बँकिंग) प्रदान करण्याचा प्रयत्न करू शकतात.


Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला; एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -