घरदेश-विदेशBBC chairman : बोरिस जॉन्सन कर्जप्रकरणी बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांचा राजीनामा

BBC chairman : बोरिस जॉन्सन कर्जप्रकरणी बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांचा राजीनामा

Subscribe

लंडन : इंग्लंडचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना दिलेल्या कर्जप्रकरणावरून बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल समोर आल्यानंतर बीबीसीचे अध्यक्ष शार्प यांनी राजीनामा दिला आहे. शार्प यांनी तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कर्जाच्या संदर्भात सार्वजनिक नियुक्तीच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे एका अहवालात आढळले होते.

- Advertisement -

आपला उत्तराधिकारी शोधण्यासाठी सरकारला वेळ देण्यासाठी जून अखेरपर्यंत थांबण्याच्या विनंतीस रिचर्ड शार्प यांनी सहमती दर्शविली आहे. 2021मध्ये ब्रॉडकास्टरच्या अध्यक्षपदासाठी सरकारने शार्प यांची निवड कशी केली, याचा तपास देशातील सार्वजनिक नियुक्तीसंदर्भातील वॉचडॉग संस्था करत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे देणगीदार रिचर्ड शार्प यांनी 2021मध्ये तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कर्जाची व्यवस्था करण्यास मदत केली होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – दिल्लीतील मेट्रो सर्वोत्कृष्ट, व्यंगचित्राबाबत जर्मनीच्या राजदूतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

रिचर्ड शार्प यांनी हितसंबंधांना नजरेआड करून सार्वजनिक नियुक्त्यांसाठी सरकारच्या संहितेचा भंग केल्याचे या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शार्प यांनी एका निवेदन जारी केले असून बीबीसीच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे मला वाटते. म्हणूनच मी आज सकाळी बीबीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परराष्ट्र मंत्री आणि बोर्डाकडे सुपूर्द केला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -