घरदेश-विदेशसावधान! OnePlus Nord 2 5G खरेदी केल्यानंतर ५ दिवसांनी झाला स्फोट; कंपनीकडून...

सावधान! OnePlus Nord 2 5G खरेदी केल्यानंतर ५ दिवसांनी झाला स्फोट; कंपनीकडून तपास सुरू

Subscribe

OnePlus Nord 2 5G हा स्मार्टफोन कंपनीच्या नॉर्ड सीरिजचा तिसरा स्मार्टफोन असून OnePlus Nord 2 5G अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. परंतू हा फोन भारतात लॉंच झाल्याने याची चर्चा होत नसून त्या फोन संदर्भात वेगळाच वाज समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की, OnePlus Nord 2 5G खरेदीच्या केवळ पाच दिवसांनी या फोनचा स्फोट झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे OnePlus चे चाहते असणारे युजर्स काहिसे धास्तावले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूची असून त्या ठिकाणी एका महिलेच्या बॅगमध्ये OnePlus Nord 2 5G फोन असताना हा स्फोट झाला. ही घटना रविवारी घडली. ट्विटरवर वनप्लसला टॅग करत या घटनेबद्दल तक्रार करण्यात आली आहे. अंकुर शर्मा नावाच्या एका युजर्सनेही याबद्दल ट्विट केले, जे आता डिलीट करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या महिलेने पाच दिवसांपूर्वी OnePlus Nord 2 5G खरेदी केला आहे. रविवारी ती आपल्या बॅगमध्ये फोन टाकून बाजारात जात होती, त्या दरम्यान ही घटना झाली. अचानक फोनला आग लागली आणि बॅगेतून धूर बाहेर येऊ लागल्याचे समोर आले असे त्या अहवालात सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वनप्लसच्या सपोर्ट टीमने ट्विटरवर या ट्विटला प्रतिसाद दिला आहे आणि असे म्हटले, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र वनप्लस कंपनीने या महिलेला नवीन फोन दिला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनप्लसने म्हटले आहे की, ते अशा प्रकरणाला गंभीरपणे घेत आहेत आणि या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. फोनमध्ये आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतात गेल्या महिन्यातच OnePlus Nord 2 लाँच करण्यात आला होता. या फोनला 4500mAh ची बॅटरी असून जी 65K फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus Nord 2 ची सुरूवातीची किंमत 27 हजार 999 रुपये असून ही किंमत 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.


भारताला धक्का! Johnson & Johnsonने देशातून लस मंजूरीचा प्रस्ताव घेतला मागे

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -