घरCORONA UPDATEVideo: कोरोना मृतदेह फेलके खड्ड्यात; घटनेने कर्नाटकात खळबळ

Video: कोरोना मृतदेह फेलके खड्ड्यात; घटनेने कर्नाटकात खळबळ

Subscribe

कर्नाटकच्या बेल्लारी गावात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात टाकले जात असल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना खड्ड्यात फेकले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जनता दल सेक्युलर पक्षाने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे कर्नाटकमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेवर काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक-एक करून अॅम्ब्युलन्समधून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. ते मृतदेह अक्षरशः खड्ड्यात फेकले जात आहेत. पीपीई कीट घातलेले कर्मचारी खड्ड्यात मृतदेह टाकताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तिथेच जेसीबी मशीन उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे. या प्रकरणी काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटकमध्ये भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. जेडीएसने ट्विटमध्ये नमूद केले आहे की, सावध व्हा, देव न करो जर तुमच्या कुटुंबातील कोणाला कोरोनाची बाधा झाली आणि त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर कर्नाटकातील भाजप सरकार अशा प्रकारे मृतदेहाची विल्हेवाट लावेल. हीच भाजप सरकारची उपाययोजना आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा –

दहशतवादी हल्ला: मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा बघतोय वाट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -