घरदेश-विदेशदहशतवादी हल्ला: मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा बघतोय वाट

दहशतवादी हल्ला: मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा बघतोय वाट

Subscribe

पोलिसांनी या चिमुरड्याची समजूत काढत त्याला ताब्यात घेतले आणि आईकडे सुखरूप पोहोचवले.

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमधील मॉडेल टाऊन भागात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गस्तीवर असलेल्या पक्षावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान जखमी आणि एका नागरिकाच्या मृत्यू झाला आहे. या घटनेदरम्यान एका नागरिकाने जीव गमावल्यानंतर एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. या हल्ल्यात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर बसलेल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा फोटो पाहून मन सुन्न होते.

सोपोरमधील बाजारपेठेत हा हल्ला करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलांनेही दहशतवाद्यांना गोळ्या घालून प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सीआरपीएफ १७९ बटालियनचा जवान शहीद झाला. तर एका नागरिकाच्याही गोळी लागल्याने मृत्यू झाला.  मृत नागरिक ६० वर्षांचे होते. हे त्यांच्या फोटोतील दृश्यातून समोर आले आहे. त्यांता मृतदेह जमिनीवर पडला असून कपड्यांना रक्ताने डाग दिसत असून या मृत माणसाचा एक ३ वर्षाचा नातू देखील तेथे उपस्थितीत असलेला दिसतोय.

- Advertisement -

हा निष्पाप चिमुरडा आपल्या आजोबांच्या मृतदेहावर अशा प्रकारे बसला आहे की, कदाचित तो त्यांच्या मांडीवर खेळत आहे. मात्र त्या चिमुरड्याला त्याच्या आजोबांना गोळी लागल्याने त्याचा जीव गेला आहे, याची अजिबातही कल्पना नसल्याचे या फोटोवरून लक्षात येत आहे. पण, मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा वाट बघत आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत तेथे उपस्थित असलेल्या पोलिस पथकातील एकाने मुलाला त्याच्याकडे सुरक्षित ठेवले, आणि दहशतवादी करत असलेल्या चकमकीच्या जागेपासून दूर नेले. या पोलिस पथकाने सोपोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या ३ वर्षाच्या मुलाला गोळ्या लागण्यापासून वाचवले आहे,अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात हा मुलगा आपल्या लाडक्या आजोबांच्या मृतदेहावर बसून निष्पापपणे ते उठतील याची वाट पाहत होता. पोलिसांनी या चिमुरड्याची समजूत काढत त्याला ताब्यात घेतले. त्याचे सांत्वन करत त्याला त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप पोहोचवले.


जम्मू-कश्मीर: CRPF च्या गस्तीवर दहशतवादी हल्ला; ४ जवानांसह १ नागरिक ठार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -