घरCORONA UPDATEदेशात आता नाकाद्वारे दिली जाणार कोरोनाची लस?

देशात आता नाकाद्वारे दिली जाणार कोरोनाची लस?

Subscribe

नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या या लसीच्या कुप्या उघडल्यानंतर त्या वापरल्या गेल्या नाहीत तर त्याचे नुकसान होईल का? अशी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.

देशातील नागरिकांना आता लवकरच नाकाद्वारे कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता आहे. कारण भारत बायोटेकच्या (Bharat Biotech)  नाकाद्वारे (Nasal vaccine)  दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीच्या बूस्टर डोसच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलसाठी ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया ( DCGI ) कडे अर्ज दाखल केला आहे. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. नाकाने दिली जाणारी ही लस रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करुन नाकाद्वारे कोरोना विषाणूला शरीरात जाण्यापासून रोखते. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, नाकाद्वारे दिली जाणारी लस कोरोनाचा बुस्टर डोस म्हणून तयार करण्यात आली आहे. कोरोनाचे म्युटेशन रोखण्यासाठी ही लस प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. ही लस १८-६० वयोगटातील नागरिकांना ही लस देण्यात येणार असून या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली.

- Advertisement -

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या या लसीच्या कुप्या उघडल्यानंतर त्या वापरल्या गेल्या नाहीत तर त्याचे नुकसान होईल का? अशी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. लस देण्यासाठी नागरिक उपलब्ध नसतील तर खुली लसीची कुपी २ ते ८ डिग्री सेल्सियस तापामानात स्टोर करुन ठेवता येऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी ती वापरता येऊ शकते. २८ दिवसांपर्यंत ही लस स्टोर करुन ठेवता येऊ शकते.

भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची माहिती दिली ते म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. नाकाने दिली जाणारी कोरोना लस आम्ही तयार केली. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला त्यांना लसीचा दुसरा डोस नाकाद्वारे देण्याचा आम्ही विचार करत आहोत. यासाठी आम्ही काही रुपरेषा आखत आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant : भारतात पुढील काही महिन्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता, AIIMS च्या डॉक्टरांचे संकेत

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -