घरदेश-विदेशभय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ड्राईव्हरने केला मोठा खुलासा

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी ड्राईव्हरने केला मोठा खुलासा

Subscribe

भय्यू महराज आत्महत्ये प्रकरणी त्यांच्या ड्राईव्हरची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून एक महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

भय्यू महाराजयांच्या आत्महत्येच्या घटनेला काही महिने झाले असले तरीही पोलिसांचा तपास अजून सुरु आहे. भय्यू महाराजांना पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या ड्राईव्हरला पोलिसांनी अटक केली होती. याच ड्रायव्हरने आता त्यांच्याबद्दल नवीन खुलासा केला आहे. या खुलाशामुळे आता या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. भय्यू महाराज यांच्या आश्रमातील एक मुलगी नेहेमी त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होती. यामुलीने ४० कोटींची रोख, मुंबईत चार बीएचकेचा फ्लॅट, ४० लाख रुपये किमतीची गाडी आणि मुंबईत एका कॉर्पोरेट कार्यलायात नोकरीची मागणी करत होती. अनेक वेळा तिने भय्यू महाराजांमागे हा तकादा लावला होता. या प्रकरणी मुलीबरोबर आश्रमातील सेवकही शामील होते. तिचे आणि भय्यू महाराजांबद्दलचे ऑडिओ आणि व्हिडिओ लोकांसमोर प्रदर्शित करण्यात भिती दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. यालाच कंटाळून महाराजांनी आत्महत्या केल्याचा दावा या ड्रायव्हरने केला आहे.

सुसाईड नोट लिहून केली होती आत्महत्या

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. इंदूरच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिलटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. भय्यूजी महाराज गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली होती. त्यामध्ये “मी माझ्या आयुष्यात तणावाखाली आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये.” असं म्हटलं होतं.भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचे कारण मागील काही महिन्यांपासून गुलदस्त्यात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -