घरताज्या घडामोडीइथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नाही; नितीश कुमारांची भाजपावर टीका

इथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नाही; नितीश कुमारांची भाजपावर टीका

Subscribe

राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिदे गट आणि भाजपा असा वाद रंगला असताना, दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातही वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नितीश कुमार यांनी शुक्रवारी समस्तीपूरमधील येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली.

राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिदे गट आणि भाजपा असा वाद रंगला असताना, दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातही वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नितीश कुमार यांनी शुक्रवारी समस्तीपूरमधील येथील इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ‘इथून पुढे आयुष्यात कधीही भाजपबरोबर जाणार नाही. सध्या आपण जिथे आहोत तिथेच एकत्र राहून, बिहार आणि देशाची प्रगती करू’ असे नितीश कुमार यांनी म्हटले. (Bihar CM Nitish Kumar slams BJP)

शुक्रवारी समस्तीपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी जाहीर कार्यक्रमात भाजपबरोबर जाणार नसल्याचे वक्तव्य केले. “भाजपचे लोक फालतू बोलतात. त्यांचे नेते चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजप केवळ समाजात संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांचा देशाच्या विकासाशी काहीही संबंध नाही. भाजपानी केवळ भांडण लावण्याचे काम केले”, असे भाष्य नितीश कुमार यांनी यावेळी केले.

- Advertisement -

“भाजपचे लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत आहेत. अटलबिहारी वाजपेयी असोत, लालकृष्ण अडवाणी असोत की मुरली मनोहर जोशी या सर्वांनी देशाच्या विकासासाठी खूप काम केले. पण आज जे केंद्रात बसले आहेत त्यांना विकासाचे काहीच देणं घेणं नाही”, असाही आरोप नितीश कुमार यांनी केला.

याशिवाय, “बिहारची अभियांत्रिकी महाविद्यालय पाटणा ही देशातील सर्वात जुनी संस्था आहे. मी त्याचा विद्यार्थी आहे. 1998 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटलबिहारी बाजपेयींनी मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले. त्यावेळी केंद्र सरकारने तीन विभागांची जबाबदारी सोपवली होती. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी खूप काम केले, पण आज केंद्रात बसलेल्या लोकांना विकासाची कोणतीही चिंता नाही”, असेही नितीश कुमार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – UAPA प्रकरणात जी. एन. साईबाबा अन् इतरांची मुक्तता करण्याचा हायकोर्टाचा आदेश SC कडून रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -