घरदेश-विदेशउत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याचे केजरीवाल मास्टरमाइंड, भाजपाचा पलटवार

उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याचे केजरीवाल मास्टरमाइंड, भाजपाचा पलटवार

Subscribe

नवी दिल्ली : केजरीवाल सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपल्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपाने याला प्रत्युत्तर देताना सिसोदिया यांना मुख्य आरोपी तर, अरविंद केजरीवाल यांना मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या घरावरील सीबीआय छाप्यावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढत असल्याने ही कारवाई केल्याचे आपने म्हटले आहे. हा मोठा घोटाळा असल्याचे भाजपाने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजपा खासदार मनोज तिवारी आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन सिसोदिया यांना मुख्य आरोपी तर, अरविंद केजरीवाल यांना मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला. सिसोदिया यांचा ‘मनी’ ष असा उल्लेखही भाजपाने केला आहे.

सिसोदिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घोटाळ्याने त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही दिले. तुमचे जर हे धोरण चांगले होते तर, ते मागे का घेतले? असा सवाल भाजपाने केला आहे. हे म्हणजे चोराच्या मनात चांदणे असल्यासारखे आहे. मद्यव्यावसायिकांबद्दल तुमच्या मनात सॉफ्टकॉर्नर का आहे? अरविंद केजरीवाल यांनी 24 तासांच्या आत देशासमोर येऊन उत्तर देण्याचे आव्हानही दिले.

- Advertisement -

काय म्हणाले सिसोदिया?
मनीष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मला दोन-चार दिवसांत अटक केली जाईल, असे म्हटले आहे. ज्या धोरणावरून हा वाद उभा केला आहे, तो या देशातील सर्वोत्तम धोरण आहे, असा दावा सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिशय प्रामाणिक आहेत. ते कामाला प्राधान्य देतात. आता देशभरात ते लोकप्रिय होत आहेत. त्यामुळेच लोकांना याचा त्रास होत आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला.

सीबीआयकडून एफआयआर
राज्य उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य 15 जणांविरुद्ध सीबीआयने काल एफआयआर दाखल केला आहे. तत्पूर्वी सीबीआयने काल सिसोदिया यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -