घरमनोरंजनसोनम कपूरने दिला गोंडस मुलाला जन्म; पोस्ट शेअर करत मानले देवाचे आभार

सोनम कपूरने दिला गोंडस मुलाला जन्म; पोस्ट शेअर करत मानले देवाचे आभार

Subscribe

ऑगस्ट महिन्यात सोनम आपल्या मुलाला जन्म देईल असं डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान, आज 20 ऑगस्ट रोजी सोनमने तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला असून ती खूप खूश आहे.

नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार अभिनेत्री सोनम कपूरने आज मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्री नीतू कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली असून कपूर आणि आहूजा कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोनमच्या प्रेग्नेंसीबाबत अनेक अपडेट समोर येत होते. ऑगस्ट महिन्यात सोनम आपल्या मुलाला जन्म देईल असं डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान, आज 20 ऑगस्ट रोजी सोनमने तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला असून ती खूप खूश आहे.

- Advertisement -

सोनम आणि आनंदने सांगितली आनंदाची बातमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

याबाबत एक पोस्ट शेअर करत सोनम आणि आनंदने त्यांना मुलगा झाला आहे हे सांगितले. तसेच ते म्हणाले की, ते खूप आनंदी आहेत आणि देवाचे खूप आभारी आहेत. त्यांनी डॉक्टरांचे देखील आभार मानले.

- Advertisement -

नीतू कपूरने दिल्या शुभेच्छा


सोनमने मुलाला जन्म दिला ही आनंदाची बातमी अभिनेत्री नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. तसेच तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनिल कपूर आणि सुनीता कपूर आजी-आजोबा झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सोनम आणि आनंदला देखील शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा :सोनम कपूरच्या घरी रंगला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, पहा फोटो

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -