घरदेश-विदेशशक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड चुकीची - सुब्रमण्यम स्वामी

शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड चुकीची – सुब्रमण्यम स्वामी

Subscribe

सरकारने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची निवड केली आहे. परंतु, सरकारची ही निवड चुकीची असल्याचे खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हटले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या गोष्टीचा विरोध केला आहे.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल गव्हर्नर पदावरुन पायउतार झाल्यानंतर सरकारने शक्तिकांत दास यांची निवड गव्हर्नरपदी केली आहे. परंतु, सरकारची ही निवड चुकीचे असल्याचे वक्तव्य खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपसमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे स्वत: भाजपचे खासदार आहेत. परंतु, भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयावर स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी निवड होणे अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हटले आहेत.

हेही वाचा – सुनंदा पुष्कर हत्या प्रकरण : स्वामींच्या याचिकेवरील निर्णय लांबणीवर

- Advertisement -

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी?

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, दास हे पी चिदंबरम यांच्यासारख्या भ्रष्ट्राचारी नेत्याचे निकटवर्तीय आहेत. दास यांनी चिदंबर यांना न्यायालयीन खटल्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर दास यांची निवड का करण्यात आली हेच आपल्याला कळत नसल्याचे स्वामी म्हणाले आहेत. आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही पाठवून या निवडीला विरोध केल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, बुधवारपासून शक्तिकांत दास यांनी गव्हर्नर पदाची धुरा हातात घेतली आहे.


हेही वाचा – कलम ३७७ वर सोना मोहापात्राचे सुब्रमण्यम स्वामींना प्रत्युत्तर!

- Advertisement -

कपिल सिंबल यांचाही विरोध

शक्तिकांत दास यांच्या निवडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देखील विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले की, दास हे अर्थतज्ज्ञ नसून नोकरशहा आहेत. त्यांनी नोटबंदीचे समर्थन केले आहे. आता सरकार जे सांगेल तेच दास करतील. त्यामुळे आणखी एका संस्थेचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याची खंत सिब्बल यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.


हेही वाचा – पी. चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -