घरदेश-विदेशकलम ३७७ वर सोना मोहापात्राचे सुब्रमण्यम स्वामींना प्रत्युत्तर!

कलम ३७७ वर सोना मोहापात्राचे सुब्रमण्यम स्वामींना प्रत्युत्तर!

Subscribe

समलैंगिकता प्रकरणावर सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यला गायिका सोना मोहापात्रा हिने ट्विटरवरूनच प्रत्युत्तर दिले आहे. सुब्रमण्यस्वामी यांनी समलैंगिकता ही हिंदुत्वविरोधी असल्याचे म्हटले होते.

समलैंगिकता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात मंगळवारपासून सुनावणीला सुरूवात झाली असून कलम ३७७ वर विविध लोकांची मतं समोर येत आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कलम ३७७ संपूर्णतः बंद करण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याला गायिका सोना मोहापात्रा हिने ट्विटरवरूनच प्रत्युत्तर दिले आहे. सुब्रमण्यस्वामी यांनी समलैंगिकता ही हिंदुत्वविरोधी असल्याचे म्हटले होते. त्यावर सोनाने त्यांची ही समज चुकीची असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सोना मोहापात्राचे ट्विट 

हिंदुत्वाबाबतचा आपला समच चुकीचा आणि अतिशय असामान्य आहे. पौराणिक कथेत शिखंडी ते मोहिनी पर्यंतचे इतर पात्र आहेत. हिंदू आणि आपल्या संस्कृती या सर्व लिंग आणि लैंगिकता या सर्वाधिक समावेश आहे, असे सोनाने सुब्रमण्यम स्वामी यांच्या एएनआयला दिलेल्या ट्विटला उत्तर देत रिट्विट केले आहे.

स्वामींची एएनआयवरील प्रतिक्रिया 

समलैंगिकता हे हिंदुत्वविरोधी आहे. अशी मानसिकता असलेल्यांना उपचाराची गरज आहे. समलैंगिकतेचा विचार येणं की काही सामन्य बाब नाही. आपण या गोष्टीचा उत्सव करू शकत नाही. यासंबंधी वैद्यकीय संशोधनात गुंतवणूक करणे शक्य वाटत असेल तर तसे करावे, तसेच केंद्र सरकारला या प्रकरणी ७ ते ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाची नियुक्ती करण्याबाबत विचार करावा, अशी प्रतिक्रीया सुब्रमण्यम स्वामी यांनी एएनआयला दिली.

- Advertisement -

काय आहे हे प्रकरण

समलैंगिकतेविषयक प्रकरणे गुन्ह्याच्या चौकटीबाहेर ठेवण्यात यावेत यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये समलैंगिकतेला गुन्ह्याच्या चौकटीत ठेवावे किंवा नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच याप्रकरणी फेरयाचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या याचिकेची सुनावणी घटनापीठासमोर करण्यात येणार असल्याचे सरन्याायधिशांनी स्पष्ट केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -