घरदेश-विदेशकाळ्या रंगाचा घोडा अचानक सफेद झाला

काळ्या रंगाचा घोडा अचानक सफेद झाला

Subscribe

भटींडामधील इंदरसिंग सेखो यांनी एका राजस्थानी मेवा सिंह नावाच्या घोडे व्यापाऱ्याकडून काळा घोडा विकत घेतला. मात्र या घोड्याचा काळा रंग अचानक निघून सफेद झाल्याने सेखो यांना १७ लाखाचा गंडा घातला आहे.

बऱ्याच जणांना आपल्या घराबाहेर काळ्या रंगाचा तगडा जवांन असलेला घोडा उभा असावा असं अनेकांच स्वप्न असत. असचं स्वप्न एका पंजाबमधील भटींडामधील इंदरसिंग सेखो यांचंही हेच स्वप्न होत. इंदरसिंग सेखो यांने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल १७ लाख रुपये मोजत घोडा विकत घेतला. मात्र काही दिवसांनी या घोड्याचा काळा रंग अचानक निघून जाऊन सफेद झाला. त्यामुळे ही नेमकी काय भानगड आहे हे इंदरसिंग यांना कळलेच नाही. मात्र आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

नेमके काय घडले?

पंजाबमधील भटींडामधील इंदरसिंग सेखो यांना एका राजस्थानी मेवा सिंह नावाच्या घोडे व्यापाऱ्यांनी घोडा विकला. हा घोडा जवांन असून त्याची कांती तुकतुकीत असून असे घोडे महाग विकले जातात. तुम्हाला म्हणून हा घोडा २४ लाखाला विकतो असे मेवा सिंह यांने इंदरसिंग सेखो यांना सांगितले. सेखो हे देखील त्या घोड्याला पाहून भुलले. त्यांनी हा घोडा आपल्याला १७ लाख रुपयाला दे अशी मागणी केली. मात्र घोडे व्यापाऱ्यांनी घासाघासी करत तो घोडा १७ लाख ५० हजाराला विकायचे ठरवले. इंदरसिंग सेखो यांना आपल्याला हा घोडा खूपच स्वस्त आणि मस्त मिळाल्याने तो आनंदाने घरी घेऊन गेला.

- Advertisement -

घोड्याची आनंदानी केली देखभाल

भटींडामधील इंदरसिंग सेखो यांनी घोडा घरी घेऊन आल्यानंतर त्याची आनंदाने देखभाल करण्यास सुरुवात केली. मात्र काही दिवसांनी या काळ्या घोड्याचा रंग अचानक निघून सफेद होऊ लागला. हे पाहून इंदरसिंग यांना धक्काच बसला. मेवा सिंह या घोडे या व्यापाऱ्यांने आपल्याला १७ लाखाचा चुनाव लावल्याचे कळताच इंदरसिंग यांचा आनंद गायब झाला असून ते प्रचंड वैतागले आहेत. इंदरसिंग सेखो यांनी राजस्थानी मेवा सिंह नावाच्या घोडे व्यापाऱ्याविरोधात फसवणूक केलेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार केल्यानंतर या भामट्या विरोधात यापूर्वी देखील ८ फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या करण्यात आल्या आहेत.


वाचा – कौन बनेगा करोडपतीच्या नावाने लूट

- Advertisement -

वाचा – गुंतवणुकीचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -