घरदेश-विदेशCBI Update : 'सब गोल माल है...भाई सब गोल माल है!'

CBI Update : ‘सब गोल माल है…भाई सब गोल माल है!’

Subscribe

सीबीआय संचालकांना त्यांच्या पदावरून हटवणं आणि त्यांच्या घराबाहेर ४ जण पाळत ठेवताना पकडणे. याचा अर्थ काय? यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 'सब गोल माल है...भाई सब गोल माल है असं ट्विट करत पंतप्रधानांना लक्ष्य केलंय.

सीबीआय केसमध्ये आता काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. सीबीआयच्या संचालकांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवल्यानंतर अलोक वर्मांच्या घराबाहेर चार जणांना पाळत ठेवताना ताब्यात घेण्यात आलं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सब गोल माल है…भाई सब गोल माल है!! असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायानं भाजपला लक्ष्य केलं आहे. सीबीआयच्या संचालकांना रात्री २ वाजता पदावरून हटवलं जाणं. त्यानंतर आयबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरावर पाळत ठेवणं याचा अर्थ काय? सब गोल माल है…सब गोल माल है!! असं ट्विट जे आहे रणदिप सुरजेवाला यांनी केले आहे. आज ( गुरूवारी ) सकाळी अलोक वर्मा यांच्या घरावर ४ जणांना पाळत ठेवताना ताब्यात घेण्यात आलं. प्रथमदर्शनी तरी हे अधिकारी आयबीचे अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच मुद्याला पकडून काँग्रेस आता भाजपला लक्ष्य करत आहे.

- Advertisement -

वाचा – CBI Case : संचालकांच्या घरावर पाळत ठेवणारे ‘ते’ ४ कोण?

राफेल करार आणि सीबीआय 

राफेल करारावरून काँग्रसनं सध्या भाजपला लक्ष्य केलं आहे. तरी, राफेल कराराची फाईल सीबीआयनं मागवल्यानं सीबीआयच्या संचालकांना पदावरून हटवल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. वर्मा यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आहे. शिवाय, आणखी १३ अधिकाऱ्यांची देखील तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेसनं केलेले आरोप अर्थमंत्री अरूण जेटलींनी फेटाळून लावले आहेत. पदावरून हटवल्यानंतर अलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे न्यायालय यावर आता काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा – ‘राफेल प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी CBI संचालकांवर कारवाई’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -