जम्मूमध्ये बॉयफ्रेंडने केली डॉक्टर गर्लफ्रेंडची हत्या, फेसबुक पोस्टमध्ये सांगितले कारण

जम्मूमध्ये एका महिला डॉक्टरची तिच्या बॉयफ्रेंडने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा महिला डॉक्टरचा मृत्यू झालेला होता, तर आरोपीची गंभीर जखमी आवस्थेत होता.

श्रीनगर – जम्मू मध्ये एका महिला डॉक्टरची तिच्याच बॉयफ्रेंडने निघृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने ज्या चाकूने गर्लफ्रेंडवर वार केले त्याच चाकूने स्वतःवर वार करुन आत्महत्येचाही प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी बॉयफ्रेंडला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

काय आहे प्रकरण
जम्मूमध्ये एका महिला डॉक्टरची तिच्या बॉयफ्रेंडने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा महिला डॉक्टरचा मृत्यू झालेला होता, तर आरोपीची गंभीर जखमी आवस्थेत होता. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून चौकशी सुरु केली आहे. आरोपीची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे त्याचा जबाब अद्याप पोलिसांनी नोंदवलेला नाही. मात्र हत्या आणि आत्महत्येआधी त्याने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये काही वैयक्तिक कारणामुळे जीवन संपवत असल्याचे त्याने लिहिले आहे.

या घटनेची माहिती आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव जौहर गनई आहे. त्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, काही वैयक्तिक कारणांमुळे जीवन यात्रा संपवत आहे. या घटनेची महिती मिळाल्यानंतर पोलिस जौहरच्या जम्मूमधील जानीपूर येथील घरी पोहोचली. तेव्हा घराचे गेट बाहेरुन बंद होते. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला. तेव्हा एका महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तर दुसरीकडे जौहर गनई गंभीर आवस्थेत निपचीत पडलेला होता. त्याच्या पोटावर चाकूचे घाव होते. पोलिसांनी दोघांनाही तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

मृत महिलेचे नाव डॉ. सुमेधा किशोर शर्मा असल्याचे समोर आले आहे. ती जम्मू मधील तालाब तिल्लो येथील रहिवासी आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डॉ. सुमेधाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. त्यासोबतच पोलिसांनी जौहर महमूद गनईविरोधात ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून हत्या आणि आत्महत्येचा तपास सुरु केला आहे.

७ मार्चला जौहरच्या घरी गेली होती डॉ. सुमेधा
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सुमेधा शर्मा आणि जौहर दोघे मित्र होते. त्यांनी जम्मूतील एका डेंटल कॉलेजमध्ये बीडीएसचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर आता सुमेधा जम्मू-काश्मीरबाहेर एका कॉलेजमध्ये एमडीएस करत होती. ती होळीच्या सुट्यांमध्ये जम्मूला आली होती. ७ मार्चला ती जौहर राहातो त्या जानीपूर भागातील त्याच्या घरी गेली. येथे दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान जौहरने चाकूने सुमेधावर वार करुन तिची हत्या केली. यानंतर स्वतःवरही त्याच चाकूने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही. तपास सुरु असून आरोपी आणि मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.