घरदेश-विदेशउतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग!

उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग!

Subscribe

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण आपण ऐकली असेल. परंतु ब्राझीलमध्ये ‘उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग’ ही म्हण बोलण्याची वेळ आली आहे. ब्राझीलमधील बसे या गावात चक्क कुमारी मुली मुलांशी लग्न करण्यासाठी उतावळ्या झाल्या आहेत. या गावात मुलांची संख्या कमी असल्यामुळे मुलींना लग्न करण्यासाठी मुले मिळत नाहीत. त्यामुळे तरुणींना विवाहीत तरुणांसोबत लग्न करण्याची वेळ आली आहे.

३०० अविवाहीत तरुणी

बसे या गावात महिलांची लोकसंख्या ६०० आहे. या लोकसंख्येमध्ये ३०० तरुणी असून त्यांना लग्नकरण्यासाठी मुलगा मिळत नसल्याने त्या अविवाहीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या गावातील तरुणींसोबत लग्न केल्यानंतर त्या मुलांनी मुलींच्याच गावात राहायचे असा त्यांचा अट्टाहास आहे. त्यामुळे या तरुणींशी लग्न करण्यासाठी सहजासहजी मुले पुढे येत नाहीत.

- Advertisement -

१८५१ साली पडला हा पायंडा

बसे गावात मारिया सनोरिया डिलिमा या नावाची तरुणी राहत होती. या तरुणीचा १८५१ साली विवाह झाला होता. मात्र या तरुणीला सासरच्या मंडळीने घरातून बाहेर काढले होते. त्यामुळे ही तरुणी पुन्हा आपल्या गावी परतली. त्यानंतर या गावात मुलींशी लग्न करणाऱ्या मुलांनी त्याचे घर सोडून मुलींच्याच गावात राहायला यायचे असा पायंडा पाडला.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -