घरदेश-विदेशसरकारी कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएलची 'ही' खास ऑफर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएलची ‘ही’ खास ऑफर

Subscribe

१ फेब्रुवारीपासून घेता येणार ऑफरचा फायदा

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल आर्थिक घडी सावरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी विभागांमध्ये बीएसएनएल सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच आता सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने रिचार्डमध्ये डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून बीएसएनएलच्या काही सर्विसमध्ये देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल १० टक्के सूट मिळवण्याचा ऑफरचा फायदा घेउ शकता.

BSNL_Kolkata नावाच्या ट्विटर अकाउंवरून कंपनीने या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी २०२१ पासून बीएसएनएल वापर करणाऱ्या प्रीपेड, पोस्टपेड, आणि ब्रॉर्डबँड सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना ५ टक्के सूट मिळत होती. मात्र ती आता १० टक्के केल्याने सरकारी कर्मचारी तसेच निृवृत्त कर्मचाऱ्यांनी ही सुविधा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलकडूनही इतर कंपन्यांप्रमाणेच BSNL broadband, bharat fiber आणि OTT Add on Pack सारख्या नवनवीन ऑफर ग्राहकांसाठी तयार करण्यात आल्या आहे. नव्या ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक ग्राहकांना वळवण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. त्यामुळे Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea चे ग्राहक बीएसएनएलकडे आपला मोर्चा वळवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -