घरदेश-विदेशबोधगयाच्या बुद्ध विहारात बालकांचे लैंगिक शोषण

बोधगयाच्या बुद्ध विहारात बालकांचे लैंगिक शोषण

Subscribe

बोधगया येथील बुद्धिस्ट ध्यानधारणा केंद्राच्या प्रमुखांना बालकांचे लैंगिक शोषन केल्याच्या आरोपाखाली काल (बुधवारी, दि. २९ ऑगस्ट) अटक करण्यात आली आहे. आसाम अभ्यासकेंद्रातील १५ बालकांचे लैगिंक शोषण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बोधगया पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. शोषण झालेली मुले ही सहा ते बारा वर्ष वयोमान असलेली आहेत. बोधगया पोलिस स्थानकाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, आम्हाला याप्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई केली आहे. शोषण झालेली मुले आणि आरोपी दोन्ही आसाम राज्यातले असून आरोपीला मस्तीपूर गावातून अटक करण्यात आली.

पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. ही मुले प्रसन्न ज्योती बुद्धिष्ट नोवीस स्कूल आणि ध्यानधारणा केंद्र या शाळेत शिक्षण घेत होती. ही शाळा प्रसन्न सोशल वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेमार्फत चालवली जाते. त्यामुळे पोलीस या संस्थेची कसून चौकशी केली जात आहे. जर आरोप सिद्ध झाले तर संस्थेच्या सर्व विश्वस्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

भंते आम्हाला बेडरुममध्ये बोलवायचे आणि…

भंते संघप्रिया सुजोय हे आम्हाला त्यांच्या बेडरुममध्ये बोलावून आमचे लैंगिक शोषण करायचे, अशी साक्ष या मुलांनी दिली आहे. भंते सांगत आहेत त्या पद्धतीने आम्ही जर नाही वागलो तर त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकीही भंते सुजोय यांनी आम्हाला दिली होती. तसेच ते आम्हाला मारहाणही करत होते, असेही या मुलांनी सांगितले. यावेळी मुलांनी आपल्या शरीरावरील जखमा पोलिसांना दाखवल्या.

पोलिस निरीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्याआधी पोलीस सर्व मुलांचा जबाव नोंदवून घेत आहेत. मुलांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर कलम १६४ अनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच सर्व १५ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोलीस संरक्षणात आसाम भवन येथे ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -