घरदेश-विदेशतुमचा टीव्ही १ फेब्रुवारीपासून होणार बंद?

तुमचा टीव्ही १ फेब्रुवारीपासून होणार बंद?

Subscribe

'१ फेब्रुवारीपासून तुमचा टीव्ही केबलमुळे बंद झाल्यास आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही', असा इशारा केबल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे.

‘येत्या १ फेब्रुवारीपासून केबलमुळे टीव्ही बंद झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही’, असा इशारा केबलचालकांनी दिला आहे. नवीन वर्षांत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय)  केबल सेवेबाबत नवीन नियम लागू केला आहे. या वर्षापासून ट्रायने प्रत्येक वाहिनीची किंमत निश्चित केली असून, ती त्यांच्या संकेतस्थळांवर जाहीर केली आहे. या नव्या नियमांनुसार, कोणत्याही वाहिनीची किंमत यापुढे १९ रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. यापुढे ग्राहकांना १३० रुपयांमध्ये शंभर फ्री टू एअर एसडी वाहिन्या उपलब्ध असतील. या वाहिन्यांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी १३० रुपयांचे चॅनेल पॅकेज घ्यावे लागणार आहे. मात्र, ट्रायच्या या नवीन नियमांना केबल चालकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच ‘१ फेब्रुवारीपासून तुमचा टीव्ही केबलमुळे बंद झाला तर आम्ही त्याला जबाबदार नाही’, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, केबल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ट्रायच्या या निर्णयावर टीका केली.


वाचा : मनसैनिकांनी बनवला ‘ठाकरे 2’, व्हिडिओ व्हायरल

अनिल परब म्हणाले की, ‘आम्ही ट्रायकडून 3 महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे. सरकारने सुवर्णमध्य काढायचा लवकरात लवकर प्रयत्न करावा, अशी आमची इच्छा आहे.’ ‘सरकारने त्यांचा आडमुठेपणा कायम ठेवला तर आम्ही आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असंही ते म्हणाले. ‘२०० रुपायांपासून ते ३५० रुपयांपर्यंत आम्ही वाहिन्या दाखवत होतो. सरकारचा हा नवा दर आम्हाला मान्य नाही. लोकांना स्वतःचं चॅनल निवडण्याचा अधिकार आहे ही सरकारची भूमिका याआधी आम्हाला योग्य वाटली पण नंतर त्यातील त्रुटी समोर आल्या’, असंही परब यावेळी म्हणाले. ‘सुरुवातीला छोटे बुके विकु नका असं सांगितलं आणि आता तेच छोटे छोटे बुके बनावण्यास सांगतात. या नव्या नियमानुसार सर्व गोळाबेरीज केली तर ही रक्कम ४५० पेक्षा जास्त जाईल. मग, याआधी आम्ही ३०० रुपयांत हेच देत होतो’, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

केबलचा धंदा सम्पवण्याचा घाट

याविषयी स्पष्टीकरण देताना परब म्हणाले की, ‘सगळ्या कंपन्यानी २५-३० बुके बनवले आहेत. यामुळे ग्राहकांचे पैसे वाढणार आहेत. या पैशातून ८०% टक्के रक्कम ब्रॉडकास्टरला आणि केबल ओपेरेटरला १० % आणि १० % MSO ला जातात. आमच्या एका ग्राहकाचा खर्च ८० रुपये आहे पण आम्हाला ७८ रुपयेच मिळतात. हा धंदा पूर्णपणे गिळंकृत करून संपवण्याचा प्रयत्न आहे.’ याशिवाय परब यांनी सांगितले की, ‘ग्रहकांकडून जे फॉर्म भरुन घ्यायचे आहेत ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचले नाहीत. येत्या १ तारखेपासून ट्राय हे नवीन नियम लागू करणार आहेत आणि आमच्यकडे फॉर्मच नाहीत. त्यामुळे १ तारखेपासून जर टीव्ही बंद झाला तर त्याला केबल ऑपरेटर जबाबदार राहणार नाहीत’.

बाळा नांदगावकर केबल धारकांच्या बाजूने

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही केबल धारकांच्या बाजूने मत दिले आहे. नांदगावरकर म्हणाले की, ‘सशुल्क वाहिन्यांच्या उत्पन्नातील ८० टक्के वाटा हा केबल व्यावसायिक आणि २० टक्के वाटा बहुविध यंत्रणा चालकांना मिळणार आहे. यामुळे केबलचालकांचे नुकसान होणार आहे. उत्पन्न वाटपातील प्रमाण हे ब्रॉडकास्टर ३० टक्के, केबल व्यावसायिक ४० टक्के आणि बहुविध यंत्रणा चालकांना ३० टक्के देण्यात यावे अशी मागणी ‘ट्राय’कडे करण्यात आली आहे.’ ‘ट्रायने निश्चित केलेल्या नवीन दरामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. त्याशिवाय केबल व्यवसायावर परिणाम होणार आहे’, अशी भीती बाळा नांदगावकर यांनी याआधी व्यक्त केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -