घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात ठाकरे चित्रपटाचे जल्लोषात स्वागत

नाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात ठाकरे चित्रपटाचे जल्लोषात स्वागत

Subscribe

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा शुक्रवारी २५ जानेवारीस सिनेमागृहांमध्ये दाखल झाला आहे. सेना कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून असलेल्या या सिनेमाच्या पहिल्याच दिवशी सेना पदाधिकार्‍यांनी चार प्रमुख थिएटरमध्ये शो बुक केल्यामुळे प्रचंड उत्साह दिसून आला.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे सिनेमा शुक्रवारी २५ जानेवारीस सिनेमागृहांमध्ये दाखल झाला आहे. सेना कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून असलेल्या या सिनेमाच्या पहिल्याच दिवशी सेना पदाधिकार्‍यांनी चार प्रमुख थिएटरमध्ये शो बुक केल्यामुळे प्रचंड उत्साह दिसून आला.

ठाकरे यांच्या जीवनाविषयी सेना कार्यकर्त्यांना कमालीची उत्सुकता दिसून येते. अनेक पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतल्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावर आधारित चित्रपट पहिल्याच दिवशी बघण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. नाशिकचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नाशिकरोड येथील आयनॉक्स थिएटरमध्ये सकाळी ८.३० चा संपूर्ण शो बुक केला. तसेच महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते सुधाकर बडगुजर यांनी त्रीमुर्ती चौकातील दिव्या अ‍ॅडलब थिएटरमध्ये दुपारी २.३० चा शो बुक केला होता. भगवे झेडें हाती घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, हिंदुह्रदयसम्राट बाासाहेब ठाकरे यांचा विजय असो,’ असा जयघोष करीत सिनेमागृहाचा परिसर दणाणून टाकला. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉलेज रोडवरील बिग बजार येथील सिनेमॅक्स येथे दुपारी ४ ला शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साडेचारला ठाकरे चित्रपट बघण्यासाठी शहरातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी हा शो बुक केला होता. एकंदरीत सकाळी साडेआठ ते सायंकाळी ४ पर्यंत प्रत्येक विभागात सिनेमागृहात संपूर्ण एक शो बुक केल्यामुळे पहिल्या दिवशी ‘ठाकरे’ हिट ठरला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह अजून किती दिवस टिकून राहतो यावर या सिनेमाचे यश अवलंबून राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -