घरदेश-विदेशCancelled Trains List : देशातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, तर १८ गाड्यांच्या...

Cancelled Trains List : देशातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, तर १८ गाड्यांच्या मार्गात बदल

Subscribe

भारतीय रेल्वे प्रशासनाने १५ ऑगस्टपासून अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या मार्गात मोठे बदल केलेत. याशिवाय अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: बदलण्यात आले आहेत. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम वेबसाईटच्या माहितीनुसार, 02443 नंबरची DEE JU SF EXP Special, Degana Jn हून जोधपुर जंक्शनदरम्यान रद्द केली आहे. ही ट्रेन दिल्लीतील सराय रोहिल्ला स्टेशनपासून जोधपूर जंक्शनदरम्यान धावते. याचप्रकारे टनकपूर ते शक्तीनगरदरम्यान धावणारी 05076 नंबरची त्रिवेणी एक्सप्रेस (स्पेशल) Chopan शक्तीनगरपासून रद्द करण्यात आली आहे. अशाप्रकारे जवळपास १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात.

‘या’ गाड्यांच्या सोर्स स्टेशनमध्ये केले बदल

भारतीय रेल्वेने १८ गाड्यांच्या सोर्स स्थानकांत बदल केले आहेत. रेल्वेने 01914 नंबरच्या एटा-आग्रा फोर्ट अनारक्षित विशेष सोर्स स्थानकात बदल केला आहे. त्यामुळे ही ट्रेन आता एटाऐवजी बरहान स्टेशनवरून धावणार आहे. त्याचप्रमाणे, 02206 नंबरची RMM-MS SF Special आता रामेश्वरमऐवजी मंडपम स्टेशनवरून धावेल. तसेच 04602 नंबरची JDNX-PTK Passenge (जोगिंदर नगर ते पठाणकोट) आता जोगिंदरनगर ऐवजी ज्वालामुखी रोड स्टेशनवरून धावेल. तसेच, 05240 क्रमांकाची सहरसा-पूर्णिया डेमू पॅसेंजर स्पेशल सहारसाऐवजी Banmankhi Jn वरुन धावेल.

- Advertisement -

आठ गाड्यांच्या मार्गात केले बदल

रेल्वेने 02262 क्रमांकाच्या HDB-KOAA SF Special च्या रुटमध्ये Ahamadpur Jn हून Dum Dum स्टेशनादरम्यानच्या मार्गात बदल केला आहे. तसेच ट्रेन क्रमांक 02335 चा मार्ग भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल स्पेशल ट्रेनच्या मार्गात भागलपूर ते किऊल जंक्शन असा बदलण्यात आला आहे. भागलपूर ते आनंद विहार टीआरएम दरम्यान धावणारी ट्रेन क्रमांक 02367 चा मार्ग भागलपूर ते किऊल जंक्शन असा बदलण्यात आला आहे. मालदा टाउन आणि हावडा जंक्शनदरम्यान धावणाऱ्या ट्रेनच्या मार्गात न्यू फरक्का जंक्शन ते Bandel Jn दरम्यान बदण्यात आला आहे.

‘या’ गाड्यांचे वेळापत्रक बदलले

रामपूर हाट -हावडा जंक्शनदरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेन क्रमांक 02348 ची HWH -MLDT INT SPL च्या वेळापत्रक पुन्हा बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

Shershaah : मुलगा कॅप्टन विक्रम बत्रा शहीद होतानाचा सीन पाहून आई-वडीलांचे डोळे पाणावले


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -