घरदेश-विदेशआगामी निवडणुकांबद्दल रामदेव बाबांचे धक्कादायक वक्तव्य

आगामी निवडणुकांबद्दल रामदेव बाबांचे धक्कादायक वक्तव्य

Subscribe

योगगुरू रामदेव बाबांनी येणाऱ्या निवडणुकांबद्दल मोठे व्यक्तव्य केले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असलेल्या रामदेव बाबांचा सुर बदलेला दिसून येत आहे.निवडणुकींवर रामदेव बाबांचे हे विधान ऐकून तुम्हालाही आश्चर्य होईल.

वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करणारे योगगुरू रामदेव बाबांनी आगामी निवडणुकींबद्दल वक्तव्य केले आहे. येणाऱ्या निवडणुकींवर रामदेव बाबांचे हे विधान ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. रामदेव बाबा या निवडणुकीत कोणाचेही समर्थन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत योगगुरू रामदेव  बाबा यांनी भाजरचे कॅम्पेनींग केले होते. म्हणून यावेळी रामदेव बाबा याच पक्षाला समर्थन देणार असल्याची चर्चा होती. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या अपयशामुळे देशभरात एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार असे जाहीर वक्तव्य करणारे रामदेव बाबा आता म्हणतात की देशाचे पंतप्रधान कोण बनेल याबद्दल सांगू शकत नाही. अशा वक्तव्यामुळे बाबा आपल्या शब्दांवर युटर्न घेतला आहे.


भाजपचा प्रचार करणार नाही 

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे रामदेव बाबा या निवडणुकीत कोणाचीह बाजू घेणार नाही. आपण ना सरकार सोबत आहोत नाही विरोधात असल्याचे तटस्थ भुमिका त्यांनी यावेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाबा म्हणाले की,”मी नेहमी राष्ट्र हिताचा विचार करतात. चांगल्या देशाचे निर्माण करणाऱ्याचे मी समर्थन करतो. राष्ट्र निर्माण, चरित्र निर्माण, शिक्षण, कृषी आणि आरोग्य या मुद्यांना मी नेहेमीच भर दिला आहे. पतंप्रधानांवर टीका करणे हा लोकांचा मुलभूत अधिकार आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -