घरट्रेंडिंगVideo : अजगराला वाचवायला गेली, त्यानं तिलाच घातला विळखा! व्हिडिओ व्हायरल!

Video : अजगराला वाचवायला गेली, त्यानं तिलाच घातला विळखा! व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

हल्ली शहरी भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मुंबईमध्ये तर अनेकदा अशा घटना घडतात. पण ही समस्या फक्त मुंबईचीच नसून जगभरात अनेक ठिकाणी अशाच घटना समोर येत आहेत. त्यातही साप आणि अजगरांचा शहरी भागात सुळसुळाट वाढला आहे. अशा वेळी सर्पमित्रांची मदत घेतली जाते. पण काही वेळा सापांना वाचवता वाचवता वाचवणारे स्वत:च अडकून पडण्याची शक्यता असते. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक मुलगी अजगराला वाचवता वाचवता स्वत:च त्याच्या जाळ्यात अडकल्याचं दिसत आहे. शेवटी तिला अजगराच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

नक्की झालं काय?

क्वीन्सलँडमधली ही घटना आहे. एका तरूणीला संध्याकाळी उशिरा तिच्या कारच्या खालच्या बाजूला एक अजगर अडकल्याचं दिसलं. भूतदया दाखवून या तरूणीने अजगराला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. पण त्या २ ते ३ मीटर लांब असलेल्या अजगरानं या तरुणीच्या पायालाच विळखा घातला. त्यामुळे तरूणीची चांगलीच पंचाईत झाली. एकटीच असल्यामुळे तिला अजगराला मोकळं करता येत नव्हतं. त्याचा विळखा इतका घट्ट होता की त्याला हलवणं तरूणीला अशक्य होऊन बसलं. अखेर आसपासच्या रहिवाशांना पोलिसांना फोन लावला. शेवटी एक महिला अधिकारी अजगराला मोकळं करायला तयार झाली!

- Advertisement -

या तरूणीने अजगराचं तोंड घट्ट धरलं. आणि दुसऱ्या बाजूने पोलीस अधिकाऱ्याने शेपटाकडचा भाग हळूहळू मोकळा करायला सुरुवात केली. हा सगळा थरार एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कॅमेऱ्यात कैद केला आहे. शेवटी अजगर पूर्ण मोकळा झाल्यानंतर तरूणीच्या जीवात जीव आला. तिने अजगराला सावधरीत्या उचलून बाजूच्या जंगलात नेऊन सोडलं आणि तिच्यावर ओढवलेला हा बाका प्रसंग कोणताही धोका न होता निभावून गेला!

पाहा घटनेचा पूर्ण व्हिडिओ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -