घरताज्या घडामोडीCAT 2021 Result : कॅट परीक्षेचा निकाल जाहीर, 'या' राज्यांनी केले टॉप

CAT 2021 Result : कॅट परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ राज्यांनी केले टॉप

Subscribe

२०२१ची CAT परीक्षा IIM अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. २८ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा देशभरात पार पडलीय. या परीक्षेचा निकाल ३ जानेवारी २०२२ रोजी घोषित करण्यात आला आहे. CAT च्या अधिकृत वेब साइटवर हा निकाल तुम्ही पाहू शकता.

देशभरात दरवर्षी CAT (Common Admission Test)   परीक्षांचे आयोजन केले जाते. देशातील विविध IIM पैकी कोणत्याही एका संस्थेद्वारे ही परीक्षा घेतली जाते. २०२१ची CAT परीक्षा IIM अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. २८ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा देशभरात पार पडलीय. या परीक्षेचा निकाल ३ जानेवारी २०२२ रोजी घोषित करण्यात आला आहे. CAT च्या अधिकृत वेब साइटवर हा निकाल तुम्ही पाहू शकता. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना देशातील प्रसिद्ध व्यवस्थापन संस्थेत IIM मध्ये प्रवेश घेता येतो. IIM अहमदाबाद लवकरच CAT टॉपर २०२१ ची यादी जाहीर करणार आहे.

‘या’ राज्यांनी केले टॉप

अहमदाबादमध्ये झालेल्या या परीक्षेत देशभारातून ८३ टक्के उमेदवारांनी सहभाग घेतला होता. CAT परीक्षेतील एकूण ९ उमेदवारांना टॉपर म्हणून घोषित करण्यात आले असून या ९ उमेदवारांनी परीक्षेत १०० टक्के मार्क मिळवले आहेत. यातील ७ विद्यार्थी हे इंजिनिअरींगची पार्श्वभूमी असलेले आहेत आणि २ उमेदवार हे नॉन इंजिनिअरींगमधून आहेत. त्याचप्रमाणे १९ उमेदवारांना ९९.९९ टक्के मार्क मिळाले आहेत. यात सर्व पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. यातील ४ उमेदवार हे गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. तर प्रत्येकी २ उमेदवार हे कर्नाटक, यूपी आणि हरियाणा येथील आहेत. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, चंदीगड आणि केरळमधील प्रत्येकी १ उमेदवार टॉप उमेदवारांमध्ये आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे २०२१ च्या CAT परीक्षेत २ ट्रान्सजेडर्सचा ही समावेश आहे. २०२१च्याCAT परीक्षेसाठी देशभरातील २.३० लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील १.९२ पात्र उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याची उपस्थिती ही ८३ टक्के इतकी होती. यात ३५ टक्के महिलांचा समावेश होता तर ६५ टक्के पुरुष आणि २ ट्रान्सजेंडर उमेदर यांचा समावेश होता.


हेही वाचा – MPSC Exam: 2021च्या राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -