घरदेश-विदेशव्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूतविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा

व्हिडिओकॉनच्या वेणुगोपाल धूतविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा

Subscribe

व्हिडिओकॉन कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आफ्रिका खंडातील देश मोझांबिक मधील गॅस, इंधन साठ्याच्या अधिग्रहणात अनियमितता आढळून आल्याने धूत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

- Advertisement -

या प्रकरणी आले होते अडचणीत

चंदा कोचर आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ पदी असताना व्हिडिओकॉन कंपनीला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यावेळी व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबल कंपनीत ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, सीबीआयने मार्च २०१८ मध्ये वेणूगोपाल धूत, दीपक कोचर आणि इतर लोकांची चौकशी सुरु केली होती. याच प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयने गेल्या वर्षी व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबादमधील कार्यालयांवर छापा टाकला होता.

हेही वाचा –

सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी – विजय वडेट्टीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -