घरदेश-विदेश'या' दिवशी होणार CTET ची परीक्षा

‘या’ दिवशी होणार CTET ची परीक्षा

Subscribe

१८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्जाची फी जमा करता येणार आहे.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET)ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)ने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार रविवारी ८ डिसेंबर २०१९ रोजी ही परीक्षा होणार असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. देशातील ११० शहरांमध्ये होणारी ही परीक्षा २० भाषेत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे १८ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्जाची फी जमा करता येणार आहे.

अशी असेल ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार देशातील ११० शहरांमध्ये २० भाषेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी त्याचप्रमाणे परीक्षेतील भाषा, अभ्यासक्रम, परीक्षा फी, परीक्षेचे ठिकाण परीक्षेसंबंधी इतर तपशील जाणून घेण्यासाठी सीटीईटीच्या अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वर १९ ऑगस्टपर्यंत ही माहिती अर्जदारांना उपलब्ध असणार आहे. १९ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्जाची प्रकिया सुरू होणार असून २३ सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज सादर करता येणार आहेत. २३ सप्टेंबर या शेवटच्या दिवशी उमेदवार दुपारी ३.३० वाजेपर्यंत फी जमा करू शकतात.

- Advertisement -

परीक्षेसाठी ही पात्रता

सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना कमीत कमी ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग, उमेदवारांना या अटीमध्ये ५ गुणांची सवलत देण्यात येणार आहे.


हेही वाचा – मतदार ओळखपत्र आधारला जोडावे; निवडणूक आयोगाचे मोदी सरकारला पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -