घरताज्या घडामोडीCedric McMillan : जिममध्ये व्यायाम करताना प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Cedric McMillan : जिममध्ये व्यायाम करताना प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रीक मॅकमिलन यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन हे आधीच हृदयासंबंधी आणि लाँग कोविड समस्यांशी झुंज देत होते. मात्र, जिममध्ये व्यायाम करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅकमिलन यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या एका स्पॉन्सरने दिली.

अमेरिकेत राहणारे सेड्रीक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर होते. २०१७ मध्ये अरनॉल्ड क्लासिक बॉडीबिल्डिंगचा किताब जिंकून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली होती.

- Advertisement -

मॅकमिलनला यांना कोविड-१९ चा बराच काळ त्रास होत असल्याचे सांगण्यात येत होते. २०२० मध्ये बरे झाल्यानंतरही ते लाँग कोविडशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याशिवाय, त्यांना हृदयविकाराचा त्रास देखील होता. त्यांना एक ते दोन वेळेस रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते.

२८ फेब्रुवारी रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅकमिलनने त्यांच्या शरीराशी संबंधित काही समस्या स्पष्ट केल्या होत्या. मी काही कारणास्तव पोटात अन्न ठेवू शकत नाही. मी जेव्हा काही खातो किंवा पितो तेव्हा उचक्या यायला सुरूवात होतात. पोटात काहीही राहत नाही, असं मॅकमिलन म्हणाले होते.

- Advertisement -

मॅकमिलन प्रायोजित करणाऱ्या कंपनी ब्लॅक स्कल यूएसएने बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. तुम्हाला कळवण्यास खेद वाटतो की, आमचा मित्र आणि भाऊ सेड्रीक मॅकमिलन यांचे आज निधन झाले. अॅथलिट, मित्र आणि वडील म्हणून सेड्रिकची खूप आठवण येईल, असे कंपनीने म्हटले आहे.


हेही वाचा : Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावरून तब्बल ३ किलोचे ड्रग्ज जप्त, NCB ची मोठी कारवाई


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -