घरCORONA UPDATEपरदेशातून भारतीयांना मायदेशी आणणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विमानातच दिले हिप-हिप हुर्रेचे नारे

परदेशातून भारतीयांना मायदेशी आणणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विमानातच दिले हिप-हिप हुर्रेचे नारे

Subscribe

कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले आहेत. विशेष म्हणजे, विमानातील क्रू मेंबर्स यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. यासंबंधीचा विमानातील एक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ मोबाईलवर शूट केलेला आहे. हे विमान अबूधाबीतून केरळमधील कोचीकरता उड्डाण घेण्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये मास्क आणि सुरक्षेच्या कारणास्तव प्लास्टिकचे कवर परिधान केलेले सरकारी विमान एजन्सीचे कर्मचारी दोन्ही हात वर उंचवत हिप हिप हुर्रे म्हणत आहेत. गुरुवारी रात्री केरळमध्ये दाखल झालेल्या दोन विशेष विमानांपैकी एकातील हा व्हिडिओ असल्याचे समजते.

हेही वाचा – लॉकडाऊनविना कोरोनाविरुद्ध लढता येतं; दक्षिण कोरियाचं ‘3T’ मॉडेल यशस्वी

- Advertisement -

दोन विमानातून मायदेशात भारतीयांची वापसी

मास्क लावलेल्या फ्लाइटच्या कॅप्टनने सांगितले की, आपला विमान उडवण्याचा अभिमान वाटतो. या विमानात प्रवासीदेखील दिसत आहेत. दोन विशेष विमानांच्या माध्यमातून भारताने मोठी कामगिरी बजावत अबूधाबी आणि दुबईमध्ये अडकलेल्या ३६३ भारतीयांना मायदेशात परत आणण्याची कामगिरी बजावली आहे. ते कोरोना विषाणूच्या संकटात लॉकडाऊनमुळे देशाबाहेर अडकले होते. लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाने डोके वर काढायला सुरूवात केली. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले. अशा परिस्थितीत देशातील प्रमुखांनी तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेत देशातील सीमा सील केल्या. विमानांची उड्डाणे थांबवली. त्यामुळे अनेक लोकं विविध देशांमध्येच अडकून पडले. आता थोड्याफार प्रमाणात लॉकडाऊन शिथील केले जात असून भारतीयांना मायदेशी आणले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -