घरदेश-विदेशचीनमध्ये तीन कोटी पुरुष अविवाहित, अविवाहित पुरुषांची संख्या काही देशांचा एकूण लोकसंख्येपेक्षाही...

चीनमध्ये तीन कोटी पुरुष अविवाहित, अविवाहित पुरुषांची संख्या काही देशांचा एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक

Subscribe

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार असे दिसून आले आहे की, देशात जवळपास तीन कोटी पुरुष हे अविवाहित आहेत. त्यामुळे चीनमधील अविवाहित पुरुषांची ही संख्या काही देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुार, चीनमध्ये फार पूर्वीपासूनच मुलीपेक्षा मुलाला नेहमी प्राथमिकता दिली जाते. दरम्यान नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार, मुलींच्या जन्मसंख्येत किंचित वाढ झाली आहे. असे असूनही, स्त्री- पुरुष लैंगिक प्रमाणाचा फरकातील अंतरात कोणताही बदल झालेला नाही.

नॅशनल ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स ब्युरोने जाहीर केलेल्या चीनच्या सातव्या जणगणेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी चीनमध्ये १.२ कोटी बाळांचा जन्म झाला होता. यापैकी १०० मुलींमागे मुलांची संख्या १११.३ इतकी होती. तर २०१० च्या जनगणनेनुसार, १०० मुलींच्या मागे मुलांची संख्या ही ११८.१ इतकी होती. परंतु आत्ताच्या जगणनेतही मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा अधिकच आहे. त्यामुळे लिंग गुणोत्तरात थोडीशी सुधारणा झाली असली तरीही फरक खूपच आहे.

- Advertisement -

याबाबत प्रोफेसर स्टुअर्ट जिन्टेन बॅस्टन सांगतात की, चीनमध्ये पुरुष सहसा आपल्यापेक्षा खूप लहान वयाच्या मुलींशी लग्न करतात. परंतु ज्या पद्धतीने पुरुषांचे वय वाढत आहे. आणि आधीच वय़ोवृद्ध पुरषांची संख्या जास्त असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दुसरे एक प्रोफेसर बीजोर्न एल्परमॅन मुलांचे जेव्हा विवाह करण्यायोग्य वयापर्यंत पोहचतात तेव्हा नववधू नसल्याबद्दल इशारा देताना म्हणले की, हे खरे आहे की गेल्या वर्षी १२ कोटी बाळांनी जन्म घेतला. परंतु यातील मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा ६,००,००० मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणार नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -