घरताज्या घडामोडीलोकांचा आवाज दाबणे ही केंद्र सरकारची कायरता, विदेशात लस पुरवठ्यावरुन नवाब मलिकांचे...

लोकांचा आवाज दाबणे ही केंद्र सरकारची कायरता, विदेशात लस पुरवठ्यावरुन नवाब मलिकांचे टीकास्त्र

Subscribe

लस विदेशात पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच पण केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्यांना अटक करु शकत नाही.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. १६ जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली, परंतु या लसीकरण मोहिमेत जेवढे लसीकरण करण्यात आले आहे त्यापेक्षा अधिक लसींचा पुरवठा विदेशात करण्यात आला आहे. यामुळे देशातील विरोधी पक्षांती नेत्यांना केंद्र सरकारव प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली अशी फलके झळकताना दिसत आहेत. लस मिळत नसल्यामुळे भाजप सरकारवर लोकं प्रश्न उठवत आहेत. किती लोकांना मोदी सरकार अटक करणार असा सवाल राष्ट्रवादी नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुलाखतीत देशातील सर्व जनता एकजूट असून किती लोकांना अटक करताय बघुया असे आव्हान केले आहे मलिक यांनी म्हटले आहे की, कोरोना लसींच्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यएनच्या दुतवासाने सांगितले की, जेवढे लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा अधिक लसींचे डोस विदेशात पुरवण्यात आल्या आहेत. यावर केंद्र सरकारने १ कोटी लसींचे डोस पाठवल्याचे सांगितले आहे परंतु काही जण पाच कोटी लसींचे डोस पुरवल्याचे सांगितले तसेच लसींचे डोस पाठवणे बंधनकारक असल्याने पाठवल्याचे काहीजण म्हणत आहेत.

- Advertisement -

देशात लसींच्या बाबतीत तुटवडा पडल्याने प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. यामुळे लोकांनी आमच्या मुलांच्या वाट्याची लस विदेशात का पाठवली असे पोस्टर्स लावले आहेत. यावर भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे की, लहान मुलांसाठी अजून कोरोना लस तयार करण्यात आली नाही. भारतातील सर्वच भारतमातेचे लेकरे आहेत. लस विदेशात पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच पण केंद्र सरकार प्रश्न विचारणाऱ्यांना अटक करु शकत नाही. अता तर संपुर्ण देश प्रश्न विचारत आहेत किती लोकांना तुम्ही अटक करणार आहात असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -