घरदेश-विदेशकेंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला

Subscribe

केंद्र सरकारने दसरा- दिवाळीपूर्वीच एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांनी मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आगे. त्यामुळे महागाई भत्ता आता 34 टक्क्यांवरून वाढत 38 टक्के झाला आहे.

केंद्राने लागू केलेली महागाई भत्त्यातील केलेली ही वाढ जुलै 2022 आणि डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळासाठी लागू असणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता 38 टक्केप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे असणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सध्या 34 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारात वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसरा दिवाळी सण जोशात साजरी होणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहेत. केंद्र सरकारत्या या निर्णयामुळे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जर एखाद्याचे पेन्शन 20,000 रुपये असेल तर 4 टक्के दराने त्यांचे पेन्शन एका महिन्यात 800 रुपयांनी वाढेल.


…. म्हणून मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील उमेदवारांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -